यवतमाळ : शहराच्या गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांचा वावर (The involvement of minors in crime) वाढत चालला आहे. गांजा अवघ्या काही रुपयांत आणि सहज मिळत असल्याने शाळकरी मुले व्यसनाच्या आहारी (Children addicted) जात आहेत. व्यसन केल्यावर डोक्यात झिंगणाऱ्या नशेमुळे ही मुले लुटमार, खून, हाणामारी, चोरी अशी गुन्हे करीत आहेत. त्यामुळे गांजाचा धूर अल्पवयीन मुलांसाठी धोकादायक ठरत आहे. (Cannabis-smoke-is-dangerous-for-minors)
यवतमाळ आणि गुन्हेगारी हे समीकरण झाले आहे. त्यातच गुन्हेगारी वर्तुळात अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढला आहे. विशेष म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांना गुन्हेगारीचे आकर्षण आहे. एखाद्या चित्रपटात गुंड ज्या पद्घतीने वागतात, त्याच पद्घतीने जीवन जगण्याचा कल या मुलांचा आहे. आयुष्य घडविण्याच्या वयात ही मुले गुंडांना आपले आदर्श मानून त्यांच्या संपर्कात जात आहेत.
गांजा व इतर व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलांचा शोध ही गुन्हेगारांची टोळी घेते. कायम नशेत वावरणारी ही मुले टोळीच्या गळाला लागतात. त्यांच्याकडून आपसी खुन्नस काढून घेतल्यावर टोळीतील सदस्य आपला हेतू साध्य करताना दिसतात. अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीला गांजाची नशा सर्वाधिक कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.
यवतमाळ शहरातील मोकळी मैदाने, जंगल परिसरातील जागा गांजा सेवनासाठी सुरक्षित मानली जाते. या ठिकाणी गांजाचा धूर सोडल्यावर ही मुले गुन्हा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवृत्त होतात. विशेष म्हणजे, पालकांचे याकडे होणारे दुर्लक्ष चिंताजनक आहे. गांजाच्या विळख्यातून मुलांना बाहेर काढण्यासाठी पोलिस प्रशासनाने बड्या गांजा विक्रेत्यांच्या मुसक्या आवळणे आवश्यक झाले आहे.
(Cannabis-smoke-is-dangerous-for-minors)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.