अकोला,ता.२५ः महापालिकेमध्ये कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये आर्थीक घोळ केल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी अखेर पेन्शन शाखेचे सेवानिवृत्त लिपिक अशोक गणेशराव सोळंके यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान महापालिकेमध्ये अशोक सोळंके यांनी सेवेत नसलेल्या लोकांच्या खात्यात महापालिकेचे पैसे कापून ते पैसे काढून घेतले होते. असे एकूण १ कोटी २७ लाख २६,९२७ रुपयाचा आर्थीक अपहार केला असल्याची तक्रार महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी अतुल दलाल यांनी सिटी कोतवाली पोलिसात दिली आहे. यावरून २५ जूनरोजी आरोपी अशोक सोळंके विरुद्ध अप.नं. २०७, कलम ४०९, ४२० भादंवि नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा तपास पो.नि. सुनिल वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक बि.सी.रेघीवाले, पोहेकॉ आतिष बावस्कर, पोकॉ नवलकार करीत आहेत.
वाल्मिकी सेनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल सारवान यांनी याप्रकरणाबाबत महापालिकेमध्ये अनेकदा माहिती मागितली. मात्र आधीच्या महापालिका प्रशासनाने माहिती दडपून ठेवली. अखेर विद्यमान अकोला मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांना भेट घेऊन चर्चा करून निवेदन देण्यात आले. तेव्हा प्रकरणाला वाचा फुटली आहे.
मागील दीड वर्षापासून यासंदर्भात पाठपुरावा सुरु होता. महापालिकेतील अधिकारी यासंदर्भात कुठलीही माहिती देण्यास तयार नव्हते. अखेर आज याप्रकरणी संबधिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
- राहुल सारवान, संस्थापक अध्यक्ष , वाल्मिकी सेना.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.