Central Bank of India : सेंट्रल बँकेचे नाव मोठे अन... लक्षण...! एटीएम मशीनच नाही, मग एटीएमचे करायचे तरी काय?

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडियाची ओळख आहे.
ATM
ATMsakal
Updated on

संग्रामपूर - शासकीय बँक म्हणून राज्यभरात मोठ नाव म्हणून सेंट्रल बँक समोर येते. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात या बँकेच्या शाखा आहेत. या शाखेच्या खातेदारांना एटीएमचे कार्ड बँकेकडून देण्यात आले. मात्र ते कार्ड चालविण्यासाठी मशीनच नाही. मग त्या एटीएमचे करायचे तरी काय? असा प्रश्न या बँकेच्या खातेदाराकरवी केला जात आहे.

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडियाची ओळख आहे. या बँकेची स्थापना सन 1911 मध्ये सर सोराबजी पोचखाणवाला यांनी केली होती. यानंतर देश स्वतंत्र झाला आणि सन 1969 मध्ये या बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. आणि ही बँक आरबीआयच्या देखरेख मध्ये गेली. या शासकीय बँकेच्या देशात खूप शाखा आहेत.

देशातील राज्यात, जिल्ह्यात आणि ग्रामीण भागात ही शाखा आहेत. आणि ग्रामीण भागात शाखा असल्याने व सरकारी असल्याने ग्राहकांचा या बँकेवर विश्वास पण बसलेला आहे. जिथं बँक तिथं एटीएम मशीन असं बँकेचे धोरण आहे. मात्र याला अपवाद म्हणून 2 जिल्ह्यातील काही गावात एटिएम मशीन नाही असे पाहायला मिळत आहे. एटीएम मशीन नसल्याने ग्राहकाची नाराजी दिसत आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील मनसगाव व संग्रामपूर तालुक्यातील पातुडाँ बु. तर अकोला जिल्ह्यातील उकळी या तीनही गावात सेंट्रल बँक ऑफ इंडियाची शाखा असून या बँकला एटीएम मशीन नाही. वरील तीनही गावात सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या बँकेला आजू बाजूला जास्तीत जास्त खेडे लागून आहेत.

शासकीय बँक म्हणून एकमात्र बँक असल्याने या परिसरातील शेतकरी, व्यापारी, कर्मचारी, छोटे-मोठे व्यवसायिक यांची खाते याच बँकेत आहे. ग्रामीण भागात शेती हेच उपजीविकेचे साधन आहे. आणि शेती साठी लागणारे कृषी कर्ज हे शासकीय बँक मधूनच मिळते. म्हणून वरील तीनही गावातील शेतकरी यांचे खाते सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आहे.

राज्य व केंद्र सरकारकडून कृषी कर्ज दिल्यानंतर त्यांना सोबतच एटीएम कार्ड पण दिल्या जाते. तसेच व्यापारी, कर्मचारी, छोटे-मोठे व्यवसायिक याचे पण खाते असल्याने प्रत्येक खातेदारला बँक एटीएम कार्ड देते व त्याचे वार्षिक फी पण घेते.

ऑनलाइन व्यवहार वर भर द्याअसे सरकार कडून सांगितले जात आहे. त्याच अनुषंगाने जास्तीत जास्त खातेदार आता ऑनलाइन व्यवहार करण्यात गुंतली आहेत. सोबतच फोन पे, गुगल पे या सारख्या ऑनलाईन ट्राजेक्शन करणाऱ्या अ‍ॅप्सला ही एटीएम कार्डची गरज भासते. वरील तीनही गावातील सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखेकडून एटीएम कार्ड वाटप करण्यात आले आहेत. मात्र एटीएम मशीन दिलेले नाही.

सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांच्यासोबत इपीइस कंपनी मुंबई यांनी एटीएम मशीन लावण्याचा करार केला होता. तो करार 10 वर्षाचा होता आणि तो करार संपल्याने आणि लो ट्राजेक्शन होत असल्याने त्या कंपनी ने एटीएम मशीन उचलून नेल्या. या गोष्टीला एक वर्षचा कार्यकाळ उलटला आहे. मागील एक वर्षापासून या तीनही बँकेला एटीएम मशीन नाही यामुळे ग्राहकांना चांगलाच त्रास होत आहे.

वास्तविक पाहता बँकेत खातेदार यांनी खाते उघल्यावर त्यांना एटीएम कार्ड देण्यात येते त्याची रीतसर फी त्याच खात्यातून डेबिट करण्यात येते. बँकेकडून सांगण्यात येते की पहिले ट्राजेक्शन हे सेन्ट्रल बँकच्या एटीएम मशीन मधूनच करावे. अन्यथा ते एटीएम कार्ड सुरू होणार नाही.

मात्र या परिसरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या तिन्ही शाखेला एटीएम मशीनच नाही. तर प्रथम व्यवहार कसे करायचे, आणि त्या कार्डचा काय फायदा? असा प्रश्न बँकेचे खातेदार करत आहेत. याकडे बँकेचे वरीष्ठ अधिकारी लक्ष देतील का? आणि खातेदार यांचा हा प्रश्न सोडवतील का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.