गोंडपिपरी : तालुक्यातील गोजोली येथील साठ वर्षीय शेतक-याने आपल्या घरीच विष प्राशन करून जिवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला.शेतकरी गंभीर असून त्याला उपचारासाठी चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमीनीच्या पटटयाचे प्रकरण प्रलंबित असतांनाही वनविभागडून उभे पिक असलेल्या शेतीतील अतिक्रमण काढण्यासाठी शेतक-यावर दबाव टाकण्यात आला असा आरोप कुटुंबियांनी केला आहे.यामुळ आता वनविभागाचे कर्मचारी गोत्यात सापडले आहेत.
गोजोली येथील गणपती सोनूने हे वनविभागाच्या जाग्यावर 1984 पासून शेती करित आहेत.सोनूने यांच्यासोबत अनेकांनी वनजमीनीचे पटटे मिळविण्यासाठी जिल्हाधिका-याकडे प्रकरण दाखल केले आहे.असे असतांना धाबा वनपरिक्षेत्रातील वनअधिकारी व वनकर्मचारी वारंवार अतिक्रमण काढण्यासंदर्भात शेतक-यांवर दबाव आणतात.सोनूने कुटुंबियांच्या सांगण्यावरून काल काही वनकर्मचा-यानी उभे पिक असलेल्या शेतात येउन अतिक्रमण काढण्यासाठी बजावले.
याचाच धसका घेत आज सकाळच्या सुमारास गणपती सोनुने यांनी किटकनाशक प्राशन करून जिवन संपविण्याचा प्रयत्न केला.त्यांना तात्काळ गोंडपिपरीच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.पण गंभीर प्रकृती लक्षात घेता त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले.वनपटटयाचे दावे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित असतांना वनविभागाकडून नाहक दिला जाणार त्रास शेतकरी बांधवाच्या जिवावर उठला आहे.
वनविभागाकडून गरीब आदिवासी बांधवांवर अन्याय करण्यात येत आहे.पिक उभ असलेल्या शेतात जाउन दम देणे,दडपशाही करणे विभागाकडून सुरू आहे.यातून शेतक-यांचे मनोबल खचत आहे.सोनूने यांनी आत्महत्येचा केलेला प्रयत्नाला वनविभागातील कर्मचारी दोषी आहेत त्यांच्यावर तातडीन कार्यवाही करावी.
-साईनाथ माष्टे,भाजपा तालुका कार्याध्यक्ष
वनविभागाकडून आम्ही कुणालाही काही बोललो नाही,कुणाच्या शेतात जाउन अतिक्रमण काढा असे सांगितले नाही.आमच्यावर लावण्यात आलेले आरोप हे चुकीचे आहेत.
-राजेंद्र लडके,वनक्षेत्र सहायक गोंडपिपरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.