चौसाळा: निर्धारीत वेळेत शाळेचे गेट उघडलेच नाही

विद्यार्थ्यासह शिक्षक राहीले ताटकळत चौसाळा येथील घटना
CHAUSALA
CHAUSALASAKAL
Updated on

चौसाळा : ग्रामीण भागातील (Rural Area) कार्यालयाच्या मुख्यालयी प्रत्येक कर्मचार्‍याने राहणे बंधनकारक असताना कुठलाच कर्मचारी (employee) वा अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने पवित्र ज्ञानदानाचे कार्य करणारी शाळा (school), आरोग्यसुविधा देणारे आरोग्य केंद्र (Hospital) वा इतर कार्यालय वेळेत उघडत नसल्याचे दिसुन येते.

CHAUSALA
सुप्रिया सुळे नागपूर दौऱ्यावर; पाहा व्हिडिओ

याकडे ग्रामस्थांसह कुणीच लक्ष देत नसल्याने सर्वकाही आलबेल असल्याचे दिसते. शाळेचा शिपाई निर्धारित वेळेवर न पोहचल्याने पाऊण तास शालेय विद्यार्थ्यासह खुद्द शिक्षकाना कुलुप उघडेपर्यंत प्रतिक्षा करण्याची घटना चौसाळा येथे घडली. मुख्याध्यापक मुख्यालयी राहत नसल्याने व निर्धारित वेळेत शाळेच्या प्रवेशद्वाराचे फाटक न उघडल्याने विद्यार्थ्यासह शिक्षक ताटकळत राहिल्याची घटना शेवंताबाई काळमेघ विद्यालय चौसाळा येथे आज घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज शनिवार २८ ऑगस्ट रोजी नित्यनियमाप्रमाणे सकाळची शाळा असल्याने शिक्षकासह विद्यार्थी-विद्यार्थीनी नियोजीत वेळेवर शाळा परिसरात हजर झाली. मात्र प्रवेशद्वारावरील फाटक कुलुप बंद असल्याने शिपाई येई स्तोवर ताटळत राहावे लागले. शाळेचे गेट बंद असल्याने विद्यार्थी रोडवरच उभे असल्याची माहिती अध्यक्षांना मिळताच ते शाळा परिसरात पोहचले त्यानंतर हालचाल झाल्याने महिला शिपाई मुख्यालयी राहत नसल्याने वेळ झाल्याची सबब सांगत फाटक उघडण्यात आले.

CHAUSALA
अ‌ॅक्शन तशी सेनेची रिअ‌ॅक्शन, उदय सामंतांचे राणेंना रोखठोक उत्तर

सदर्हु शाळेत निमखेड बाजार, हिरापूर, चिचोना, खिराळा, लखाड, सातेगाव, आडगाव खाडे, कारला, तूरखेड रुईखेड व चौसाळा येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. ७.५७ पर्यंत गेटच्या बाहेर उभे जवळपास पाऊनतास कुलुप उघडेपर्यंत विद्यार्थी ताटकळत राहील्याने जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गजाननराव वानखडे सह पालक वर्ग संतप्त झाले.

ग्रामीणभागातील कार्यालयात कुठलाच कर्मचारी वा अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने पवित्र ज्ञानदानाची वास्तुही वेळेवर उघडत नसल्याची चर्चा तालुकाभरात होत आहे. अध्यक्षांनी शाळेच्या मुख्याध्यापीका कु. पी. एन. गावंडे यांना कळवली असता याची दखल घेत संबंधित कर्मचारी महिला शिपाई यास नोटीस बजावली असुन जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण अधिकारी (माध्य) अमरावती याना कळविले. घडलेला प्रकार खेदजनक असून संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी अशी सूचना गट शिक्षणाधिकारी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.