चिखलदरा - लोकसभा निवडणुकीचे मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे. यादरम्यान ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या वॉर्ड, मोहल्ल्यातील मतदारयाद्यांमध्ये प्रचंड घोळ झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये एकाचा फोटो तर त्याच्या खाली दुसऱ्याचेच नाव दिसून येत आहे. असा प्रकार मतदारयादीत आपले नाव बघायला गेलेल्या मतदात्यांना दिसून आला. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करीत दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
कुठलीही निवडणूक म्हटल्यावर मतदारयादी निवडणूक ओळखपत्रासह इतर काही आवश्यक शासकीय ओळख देणारा पुरावा मतदान करताना वापरता येतो. तशी मुभा निवडणूक आयोगाने दिली आहे. परंतु मतदारयादीतच चुकीचा फोटो व दुसऱ्याचे नाव आले असल्याने तारांबळ उडाली आहे.
शहरातील समाजसेवक हाजी मोहम्मद अशरफ, त्यांचे बंधू मोहम्मद सलीम व परिवारातील सदस्यांच्या फोटोखाली इतर दुसऱ्यांचे नाव आल्याचा प्रकार मतदारयादीतून पुढे आला आहे. दुसरीकडे त्यांचा फोटो आणि त्यांचे योग्य नावसुद्धा आहे. अर्थात दोन वेळा मतदारयादीत त्यांचा फोटो वापरला गेला. त्यामुळे इतरही मतदार आता आपले नाव मतदारयादीत फोटोसह तपासत असल्याचे चित्र आहे.
चूक कुणाची?
शहरी भागात वॉर्डनिहाय बीएलओ नवीन मतदान कार्डमध्ये नाव बदल, फोटो बदल आदी सर्व बाबीत मदत करतात. परंतु पुढील प्रक्रिया करणारे कर्मचारी त्यांच्यावरील कामाचा व्याप पाहता याचा फोटो त्याचे नाव, असे बरेचदा होत असल्याचे उघडकीस आले आहे. आलेले मतदानकार्ड योग्य आहे किंवा नाही, मतदारयादीत आपले नाव व फोटो बघण्याची जबाबदारी मतदारांची सुद्धा असल्याचा नियम आहे. त्यामुळे प्रशासनासोबत मतदारांची ही चूक असल्याचे अधिकारी सांगतात.
मतदारयादी प्रकाशित होताच मतदात्यांनी ती तपासणे गरजेचे असते. चुका दुरुस्त करण्याच्या मुभा आहेत. त्यावेळेत करणे गरजेचे असते. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, हे प्रशासनाचे कर्तव्य आहे.
- अश्विनी जाधव, तहसीलदार तथा सहायक निवडणूक अधिकारी, चिखलदरा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.