आईच्या अंत्यदर्शनासाठी केला अडीचशे किलोमीटरचा प्रवास; मात्र, तयारी पूर्ण झाल्याने...

child and relative attended funerals on phone
child and relative attended funerals on phone
Updated on

कारंजा (घाडगे) (जि. वर्धा) : "मृत्यूच्या वाटेवर जाताना सगळेच आधार तुटले होते. दोन अश्रू ढळून लोक मला निरोप देत होते. त्याही वेळी मला एका गोष्टीचे समाधान वाटत होते. अजून माझ्या परत येण्याची कुणीतरी वाट बघत होते' या कवितेच्या ओळी जन्मदात्रीच्या अंत्यदर्शनाला न पोहोचू शकलेल्या सचिन वलगावकर यांच्या बाबतीत खऱ्या ठरल्या आहेत. 

कारंजा येथील शकुनबाई वामनराव वलगावकर यांचे शुक्रवारी (ता. 17) रात्री नऊ वाजताच्या सुमारास यवतमाळ येथे मुलीच्या घरी निधन झाले. त्यांचा एकुलता एक मुलगा सचिन हा अनेक वर्षांपासून नोकरीनिमित्त ठाणे (मुंबई) येथे राहतो. आईच्या निधनाची बातमी त्याला कळली व अंत्यदर्शनाची इच्छा असलेल्या सचिनने लगबगीने तयारी केली. अंतर जास्त कापायचे असल्यामुळे पोहोचायला वेळ होईल म्हणून त्याने प्रशासनाकडून कोणतीही परवानगी न घेता स्वतःच्या वाहनाने परिवारासह तो निघाला. परंतु, अहमदनगरपर्यंत आल्यानंतर त्याला पोलिसांनी अडविले. त्यामुळे आईच्या अंत्यदर्शनाची ओढ असलेल्या सचिनची निराशा झाली.

अडीचशे किलोमीटरचे अंतर कापून आल्यानंतर पुन्हा त्याला परवानगीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी परत ठाणे येथे जावे लागले. ती प्रक्रिया पूर्ण करून तो येथून निघाला. परंतु, इकडे आईच्या अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झाल्यामुळे त्याला अंत्यदर्शन घेता आले नाही. कारंजा येथील शकुनबाईचे भाऊ किशोर दिवाने यांनासुद्धा अंत्यसंस्काराला जाता आले नाही. अखेर मुलासह सर्व आप्तेष्टांना मोबाईलवरूनच अंत्यदर्शन घेण्याचा दुर्दैवी योग आला. 

गावातील नागरिकांनी व्यक्त केली हळहळ

शकुनबाई या मृत्यूसमयी 67 वर्षांच्या होत्या. त्यांचे माहेर व सासर कारंजाच होते. येथील ग्रामीण रुग्णालयातील सेवानिवृत्त लिपीक वामन वलगावकर यांच्या त्या पत्नी होत्या. तीन वर्षांपूर्वीच त्यांच्या पतीचे निधन झाले होते. शकुनबाई या मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. सतत सर्वांची आस्थेने विचारपूस करायच्या. त्यांच्या अंत्यसंस्काराला कोरोनामुळे अनेकांना उपस्थित राहता आले नाही. याबद्दल आप्तेष्ट व गावातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

अडीचशे किलोमीटर केला प्रवास

आईच्या निधनाची बातमी समजताच सचिन याने अंत्यदर्शनासाठी लगबगीने तयारी केली. तो ठाणेवरून (मुंबई) कुठलीही परवानगी न घेता कुटुंबासह निघाला. अडीचशे किलोमीटर असे अंतर कापून अहमदनगरपर्यंत आल्यानंतर त्याला पोलिसांनी अडविले. आईचे निधन झाल्यामुळे कुठलीही परवानगी न घेतल्याचे त्याने पोलिसांनी सांगितले. मात्र, त्यांनी काहीही ऐकले नाही. यामुळे तो परवानगीसाठी परत मुंबईला निघाले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.