नागपूर : कोरोनाची उत्पत्ती चीनमध्ये झाल्याबद्दल मतप्रवाह असले तरी चीनने मात्र, टाळेबंदीच्या काळात भारतासह जगातील सर्वच देशातून लोखंडांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. टाळेबंदी उठताच देशांतर्गत बाजारात मागणी वाढल्याने लोखंडाच्या दरात अचानकच २० टक्के भाववाढ झाली. चीनने लोखंडांच्या दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी ही कृती केली आहे.
वाढलेल्या दरात ग्राहकांना लोखंड खरेदी करावे लागत असून, त्याचा फटका बांधकाम क्षेत्राला बसू लागला आहे. जानेवारी महिन्यात लोखंडाचे भाव ३८,००० रुपये टन होते. मार्च महिन्यापर्यंत या दरात किंचित चढ उतार सुरू होती. २४ मार्चला देशात टाळेबंदी लागू झाल्याने संपूर्ण यंत्रणा ठप्प पडली.
दरम्यान, लोखंडांचे उत्पादन करणे कारखाने, पायाभूत सुविधा, बांधकाम प्रकल्प बंद झालेत. टाळेबंदीमध्ये शिथिलता मिळताच चिनने भारतासह जगातील सर्वच देशातील लोखंडाची खरेदी करण्याचा सपाटा सुरू केला. लोखंड उत्पादकांनी आपल्या जवळील लोखंडाची विक्री केली.
टाळेबंदीनंतर कारखानदारांनी पुन्हा उत्पादन सुरू केले. मात्र, कच्चा मालाची मागणी अचानक वाढल्याने मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण झाली आणि दर वधारले. काही व्यावसायिकांना दर उरतील असे वाटल्याने त्यांनी उत्पादन सुरू करण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, कच्चा मालाला मागणी वाढल्याने भावात अजून वाढ झाली.
कारखानदारांनी पुरवठादारासोबत केलेल्या करारानुसार माल पाठविण्याची वेळ जवळ आल्याने अखेर उत्पादकांना अधिकच्या दरात कच्चा माल खरेदी करावा लागला. लोखंडाच्या दरात वाढ झाली आणि जुन्याच दरात पुरवठादारांना लोखंडांचा पुरवठा करावा लागल्याने कारखानदारांचे मोठे नुकसान झाले. टाळेबंदीनंतर कारखाने सुरू झाले हे जरी बरोबर असले तरी चिनने सर्वाधिक लोखंड खरेदी केल्याने भाव वाढले आहेत. लोखंडाच्या दरात अजून भाव वाढ होण्याची शक्यता आहे.
लोखंडाचे भाव वाढणार
चिनने टाळेबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात लोखंडाची खरेदी केली. यामुळे देशांतर्गत बाजारात लोखंडाची टंचाई निर्माण झालेली आहे. ही स्थिती लक्षात घेता कारखानदारांकडून अजून भाववाढीचे संकेत मिळू लागले आहेत.
नितीन लोणकर, माजी अध्यक्ष बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.