Amravati News : २६ नोव्हेंबरला मुख्यमंत्री अमरावतीत; सायन्सकोर मैदानात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम

सायन्सकोर मैदानावर २६ नोव्हेंबर रोजी आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत.
cm eknath shinde in Amravati on November 26 shasan applya daari initiative at Sciencecore Maidan
cm eknath shinde in Amravati on November 26 shasan applya daari initiative at Sciencecore MaidanSakal
Updated on

अमरावती : शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम शासनामार्फत राबविण्यात येत आहे. सायन्सकोर मैदानावर २६ नोव्हेंबर रोजी आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत.

समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचून त्यांना साहाय्य व्हावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या अनुषंगाने ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच अमरावतीत येत असल्याने सर्वांची उत्सुकता ताणल्या गेली आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत प्र. जिल्हाधिकारी सूरज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवनात बैठक घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता चंद्रकांत म्हेत्रे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, पोलिस उपायुक्त विक्रम साळी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी तसेच विविध विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

प्र. जिल्हाधिकारी वाघमारे म्हणाले, या अभियानांतर्गत नागरिकांना शासकीय योजनांशी निगडित कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी तसेच कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देतील. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विविध विभागांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिक येणार असल्याने आरोग्य व्यवस्था उभारण्यात यावी. फिरत्या स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात यावी तसेच परिसरात स्वच्छता राहील, यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बॅरिकेट्सची व्यवस्था तसेच आगीच्या स्थितीबाबत योग्य ती काळजी घेण्यात यावी. कार्यक्रमाच्या दिवशी शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक विभागाने आपले नियोजन करावे, असे आवाहन श्री. वाघमारे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.