...अन् विजयी उमेदवारच झाला पायउतार, काही दिवसातच आनंदावर पडलं विरजण

collector disqualify candidate who won khambada grampanchayat election in chandrapur
collector disqualify candidate who won khambada grampanchayat election in chandrapur
Updated on

खांबाडा (जि. चंद्रपूर ) : मागील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा हिशेब सादर न करणे एका उमेदवाराला चांगलेच महागात पडले. यंदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवाराला पायउतार व्हावे लागले. संतोष उरकुडे, असे या उमेदवाराचे नाव आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने या विजयी उमेदवाराला पायउतार व्हावे लागले. 

खांबाडा ग्रामपंचायतीची सात ऑगस्ट 2015 रोजी निवडणूक झाली. ही निवडणूक संतोष उरकुडे यांनी लढविली होती. मात्र, त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यावेळीस निवडणूक खर्च त्यांना सादर करावयाचा होता. निवडणूक निकाल लागल्यापासून काही दिवसांच्या आत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करणे आवश्‍यक होते. मात्र, त्यांनी निवडणुकीचा हिशेब सादर केला नाही.  त्यामुळे 2017 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना पाच वर्षांसाठी अपात्र घोषित केले होते. यंदा ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. उरकुडे यांनी नामनिर्देशन पत्र भरले. निवडणूक लढवली. ते विजयीही झाले. निवडून आल्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराने तक्रार दाखल केली. याच तक्रारीच्या अनुषंगाने संतोष उरकुडे यांना अपात्र केले. निवडून येऊन काही दिवस झाले असतानाच पायउतार व्हावे लागल्याने उमेदवाराच्या आनंदावर विरजण पडले. याबाबत उमेदवार न्यायालयात दाद मागणार असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.