Mahavikas Aghadi: विदर्भातल्या या जागेसाठी ठाकरे - काँग्रेस येणार आमने सामने? एका मतदारसंघासाठी दोघेही आग्रही

Mahavikas Aghadi: विदर्भातल्या या जागेसाठी ठाकरे - काँग्रेस येणार आमने सामने? एका मतदारसंघासाठी दोघेही आग्रही
Updated on

राजेश चरपे

Nagpur: शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी नागपूर जिल्ह्यातील दोनच विधानसभा मतदारसंघात शिवसेना लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ग्रामीणमध्ये रामटेक मतदारसंघाला शिवसेनेची पहिली पसंती आहे. शहरात मात्र मोठा पेच आहे. सेनेने केलेल्या अंतर्गत सर्वेत मध्य नागपूरला पसंती देण्यात आली असली तरी पदाधिकाऱ्यांचा आग्रह मात्र दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघासाठी आहे. आता नेते सर्वेला प्राधन्य देतात की पदाधिकऱ्यांचा आग्रह राखतात यावरच सर्व काही अवलंबून आहे.

Mahavikas Aghadi: विदर्भातल्या या जागेसाठी ठाकरे - काँग्रेस येणार आमने सामने? एका मतदारसंघासाठी दोघेही आग्रही
Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीत पुन्हा धुसफूस? या महत्वाच्या जागेवर कॉंग्रेसचा दावा

राऊत नागपूरला आले असता त्यांनी दोनच मतदारसंघात निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दक्षिण नागपूर मतदारसंघावर दोन जिल्हाध्यक्ष आणि दोन शहराध्यक्ष यांनी दावा केला आहे. जिल्हा प्रमुख प्रमोद मानमोडे आणि किशोर कुमेरिया आणि शहर प्रमुख नितीन तिवारी आणि दीपक कापसे हेसुद्धा येथे दावेदार आहेत. विशेष म्हणजे यापैकी कोणाचेच आपसात पटत नाही.

यापैकी कोणा एकाला तिकटी दिली तरी नाराजी अटळ आहे. भाजपसोबत युतीत असताना दक्षिण नागपूरमध्ये आतापर्यंत तीन वेळा शिवसेनेचा पराभव झाला आहे. त्यापूर्वी पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा शिवसेना लढली. प्रवीण बरडे, ज्ञानेश्वर वाकुडकर आणि शेखर सावरबांधे पूर्व मधून लढले होते.

Mahavikas Aghadi: विदर्भातल्या या जागेसाठी ठाकरे - काँग्रेस येणार आमने सामने? एका मतदारसंघासाठी दोघेही आग्रही
Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीने वातावरण कलूषित करत जिंकल्या जागा, माजी आमदाराचा दावा

बरडे आणि सावरबांधे हे विजयाच्या समीप पोहचले होते. मात्र त्यांनी विजयात रुपांतर करता आले नाही. आता पूर्व नागपूरचे समीकरण बदलले आहे. भाजपचे येथे जबरदस्त वर्चस्व निर्माण केले आहे. मात्र तीन वेळा विधानसभा लढूनही शिवसेनेला दक्षिण नागपूरमध्ये आपला दबदबा निर्माण करता आला नाही.

महाविकास आघाडी असल्याने यावेळी शिवसेनेला फायदा होणार असला तरी काँग्रेस येथे दुसऱ्या क्रमांकावर होती. काँग्रेसचे गिरीश पांडव अवघ्या पाच हजाराच्या मताधिक्याने येथून पराभूत झाले होते. हे बघता काँग्रेस दक्षिण नागपूर सोडले असे वाटत नाही. महाविकास आघाडीचा विचार करता मध्य नागपूर जास्त फायद्याचा राहील असला अंदाज वर्तविला जात आहे. सुमारे साडेतीन लाखांचा हा मतदारसंघ आहे.

Mahavikas Aghadi: विदर्भातल्या या जागेसाठी ठाकरे - काँग्रेस येणार आमने सामने? एका मतदारसंघासाठी दोघेही आग्रही
Mahavikas Aghadi : विधानसभेसाठीही एकजूट; ‘मविआ’चा निर्धार

यात ७० हजार मुस्लिम, २२ हजार दलित आणि ९० हजार हलबा असे सुमारे पावणे दोन लाख मतदार आघाडीसाठी जमेची बाजू आहे. हलबा समाज सध्या भाजपवर प्रचंड नाराज आहे. मुस्लिमांनी उद्धव ठाकरे यांना आता स्वीकारले आहे. मिलिंद किर्तीकर यांनी केलेल्या पक्षांतर्गत सर्वेत मध्य नागपूरलाच पसंती दर्शवली आहे. जाहीरपणे त्यांनी हे बोलून दाखवले आहे.

Mahavikas Aghadi: विदर्भातल्या या जागेसाठी ठाकरे - काँग्रेस येणार आमने सामने? एका मतदारसंघासाठी दोघेही आग्रही
Vidhan Sabha Election News: लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभेला विलंब?| Maharashtra Politics

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.