वाशीम लोकसभेची खासदारकी शिवसेने (उबाठा) कडे आहे. जिह्याचे ठिकाण असल्याने हा मतदार संघ काँग्रेस पक्षाला मिळणे आवश्यक आहे. हा मतदार संघ महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला मिळावा अशी काँग्रेस पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी आहे.
तसे निवेदन अनुसुचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांना देऊन काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला आहे, तर दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) याच मतदारसंघासाठी आग्रही असल्याने महाविकास आघाडीत वाशीम मतदारसंघ कळीचा मुद्दा ठरणार आहे.
वाशीम-मंगरूळपीर विधानसभा मतदार संघ १९७२ पासून काँग्रेसकडे आहे. या मतदार संघाच्या मागील सर्व निवडणुका काँग्रेस पक्षानेच लढविल्या आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महविकास आघाडीचे खासदार संजय देशमुख यांना या मतदारसंघातून मतांची प्रचंड आघाडी मिळाली आहे. त्यामध्ये काँग्रेस पक्षाचा फार मोठा वाटा आहे. मागील वर्षी याच मतदार संघात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा मुक्काम होता. यामुळे पूर्ण जिल्हा काँग्रेसमय झाला होता.
या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या आजी-माजी जि.प.सदस्य, न.प.सदस्य, महिला आघाडी, युवा आघाडी, सर्व आघाड्यांचे पदाधिकारी तसेच सर्व जिह्यातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी प्रचार दरम्यान घेतलेली मेहनत, शहरात तसेच मतदार संघातील, सर्कलमधील काँग्रेस पक्षाचे आजी-माजी सदस्यांनी, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला प्रचार, इत्यादी कारणाने महाविकास आघाडीला या मतदारसंघात ३९ हजार ५०० ची प्रचंड अशी आघाडी घेता आली. त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय सुकर झाला. येथे खासदार शिवसेना (उबाठा) चा आहे.
जिह्याचे ठिकाण असल्याने हा मतदार संघ काँग्रेस पक्षाला मिळावा अशी काँग्रेस पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सोडवून घेण्यासाठी प्रदेश सरचिटणीस ॲड. दिलीपराव सरनाईक यांच्या नेतृत्वामध्ये मतदार संघातून काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व इच्छुक उमेदवार पदाधिकारी नागपूर येथे काँग्रेस पक्षाचे अनुससूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले. यावेळी हा मतदार संघ काँग्रेस पक्षाला मिळण्याकरिता सह्यांचे निवेदन देण्यात आले.
हा मतदारसंघ पूर्वीपासून काँग्रेस पक्षाकडे असल्याने काँग्रेस पक्षाला मिळाण्याकरिता सर्व पदाधिकारी यांनी सविस्तर चर्चा करून मागणी केली. यावेळी त्यांनी वाशीम विधानसभा मतदार संघ महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्ष घेणार असल्याचे सांगितले.
उमेदवारीचे निकष
हा मतदार संघ काँग्रेस पक्षाला सुटल्यानंतर उमेदवार देताना काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी अर्ज भरलेल्यांनाच दिला गेला पाहिजे तसेच उमेदवार काँग्रेस पक्षामध्ये पूर्वीपासून काम करणारा सक्रिय कार्यकर्ता असावा. त्याने अनेक वर्षांपासून पक्षात काम केलेले असावे, वेळेवर पक्षात प्रवेश केलेले तसेच पैशाची लालुच दाखऊ पाहणाऱ्या बाहेरच्या कोणालाही तिकीट दिले जाऊ नये, असे उपस्थित इच्छुक उमेदवारांनी ठामपणे सांगितले असता इच्छुकांमधून जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या सहमतीने निवडून येण्याचा निकष यावर उमेदवारी दिली जाईल, असेही राऊत यांनी उपस्थित शिष्टमंडळाला सांगितल्याची महिती समोर आली आहे.
यांनी दिले निवेदन
नितीन राऊत यांना निवेदन देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजुभाऊ चौधरी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नंदा गनोदे, माजी जि. प. सभापती किसनराव मस्के, माजी जि.प.सभापती रमेश शिंदे, माजी तालुकाध्यक्ष परसराम भोयर, मंगरूळपीर तालुकाध्यक्ष दिलीप मोहनावाले, वाशीम तालुकाध्यक्ष महादेव सोळंके, वाशीम शहराध्यक्ष शंकरराव वानखेडे, मंगरूळपीर शहराध्यक्ष सलीम जागीरदार, माजी न.प.सदस्य मिर्झा उबेद बेग, प्रा.दादाराव देशमुख, माजी कृ. उ. बाजार समिती संचालक अनिल गोटे, रुपेश नायक, तालुका युवक अध्यक्ष वासुदेव तायडे, उद्देभान लांडगे, नंदा तायडे इत्यादी पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांपैकी उत्तम खडसे, समाधान माने, मधुकर जुमडे, सुरेश मोरे, नयन कऱ्हे, तुषार गायकवाड, ॲड. पी. पी. अंभोरे, स्वप्निल तायडे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.