Lok Sabha Election : देशातील जनता PM मोदींना सत्तेतून अलविदा करणार; काँग्रेसच्या बड्या नेत्याचं विधान

देशात एकीकडे भाजपकडून ४०० पार चा नारा दिला जात असताना दुसरीकडे देशात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रचंड विरोधाची लाट आहे, असे जयराम रमेश म्हणाले आहेत.
Lok Sabha Election : देशातील जनता PM मोदींना सत्तेतून अलविदा करणार; काँग्रेसच्या बड्या नेत्याचं विधान
Updated on

अमरावती : देशात एकीकडे भाजपकडून ४०० पार चा नारा दिला जात असताना दुसरीकडे देशात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रचंड विरोधाची लाट आहे. त्यामुळे २००४ ला ज्याप्रमाणे भाजपाने शायनिंग इंडियाची घोषणा केली तेव्हा भाजप सत्तेवरून पायउतार झाली, तशीच परिस्थिती आता देशात असून ४ जूनला देशातील जनता पंतप्रधानांना सत्तेतून अलविदा करणार आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय काँगेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी आज (ता.२०) येथे केले.

अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीनिमित्त ते अमरावतीला आले होते, यावेळी त्यांना प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री अॅड.यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, प्रवक्ते अॅड. दिलीप एडतकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जयराम रमेश म्हणाले, पहिल्या टप्प्यातील झालेल्या मतदानातून भाजप सत्तेमधून आउटगोईंग होणार याचे स्पष्ट संकेत मिळत आहे. दक्षिणेमध्ये भाजपा पूर्णपणे साफ होईल तर उत्तर पूर्वमध्ये अर्ध्यावर येईल, असे स्पष्ट संकेत असून अब की बार ४०० पार ची घोषणा देशातील जनताच अपयशी ठरविणार आहे, असेही ते म्हणाले.

Lok Sabha Election : देशातील जनता PM मोदींना सत्तेतून अलविदा करणार; काँग्रेसच्या बड्या नेत्याचं विधान
Weather Update: पुण्यात पुन्हा येणार वादळी पाऊस! मराठवाड्यासह 'या' भागात पुढील तीन तासांत मुसळधार पावसाची शक्यता

बाबासाहेबांची राज्यघटना बदलवून भाजपा देशात रा.स्व.संघाचा अजेंडा राबविण्याच्या विचारात आहे. आमची लढाई केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून न्यायाची व संविधान वाचविण्यासाठी आहे. पाच न्यायपत्र आणि २५ गॅरण्टीपत्रासह आम्ही तत्त्वांनी या निवडणुकीला सामोरे जात असल्याचे जयराम रमेश म्हणाले. काँग्रेसच्या न्यापत्रामध्ये शेतकरी, शेतमजूर, नारीशक्ती, बेरोजगार युवावर्ग, कजमाफी या सर्व बाबींचा समावेश आम्ही केला असून देशातील जनताच त्याला पसंती देईल, असेही ते म्हणाले.

Lok Sabha Election : देशातील जनता PM मोदींना सत्तेतून अलविदा करणार; काँग्रेसच्या बड्या नेत्याचं विधान
Pakistan News : पाकिस्तानची आर्थिक चणचण संपेना! पुन्हा IMF कडे मागितली सहा अब्ज डॉलरच्या मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.