'पंतप्रधान मोदींच्या नमामी गंगेची झाली शवामी गंगे'

pm modi
pm modi e sakal
Updated on

नागपूर : देशात कोरोनाच्या काळात गंगा नदीच्या पात्रात शेकडो मृतदेह (corona patients dead bodies in ganga ) वाहत येत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. २०१४ ला उत्तरप्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (pm narendra modi) ‘नमामी गंगे’ म्हणत गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रमाची घोषणा केली होती. परंतु, आता मात्र परिस्थिती ‘शवामी गंगे’ अशी झाली आहे. आज ७ वर्षाच्या मोठा कालखंड लोटून देखील केंद्र सरकारच्या उदासीनतेमुळे व नियोजनशून्य कामामुळे नमामी गंगेचे रूपांतर शवामी गंगेत झाला असल्याचा घणाघाती आरोप कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर (congress mp balu dhanorkar) यांनी केला आहे. (congress mp balu dhanorkar criticized pm modi on dead bodies found in ganga river)

pm modi
अमरावती रेमडेसिव्हिर काळाबाजार : कंत्राटी डॉक्टरसह पाच जणांची हकालपट्टी, दोघांना जामीन

गंगा नदीवर ४० टक्के लोकांचं जीवनमान अवलंबून असलेली ही पवित्र नदी आहे. जगाच्या नकाशावर सांस्कृतिक व पवित्र नदी असा उल्लेख आहे. पण आज शेकडोंच्या संख्येने मृतदेह या नदीतून वाहत आहेत. या प्रकारामुळे भारताची मान शरमेनं खाली गेली आहे आहे. हा संपूर्ण भारतवासीयांचा जगभरात झालेला अपमान आहे. कोरोनावर मात करण्याच्या या लढ्यात मोदी सरकारनं विरोधी पक्षांना आणि त्यांच्या सूचनांचाही विचार केला पाहिजे, असेही खासदार धानोरकर म्हणाले.

उत्तर प्रदेशात मर्यादा ओलांडून अमानवतेचं दर्शन होत आहे. सरकार आपली प्रतिमा बनवण्यात व्यस्त आहे आणि जनतेचं दु:ख असह्य होत चाललं आहे. त्यामुळे जगात देशाचे नाव चुकीच्या पद्धतीने घेतले जात आहे. कोरोनाच्या उपाययोजना करण्यासाठी विरोधी पक्षाच्या सूचना देखील विचारात घेतल्या पाहिजे. कोरोनाची लढाई ही फक्त भारतीय जनता पक्षाची एकट्याची नाही, तर सर्व देशवासीयांची आहे. त्यामुळे या लढाईत राजकारण न करता सर्वांना सोबत घेऊन निर्णय घ्यावे, अशी सूचनादेखील महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.