‘आता हाडातील रक्तही काढले जातेय’

‘आता हाडातील रक्तही काढले जातेय’
Updated on

यवतमाळ : पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलाचे भाव वाढत असताना केंद्र सरकार बोलायला तयार नाही (The central government is not ready to talk). काँग्रेसने आंदोलन करून महागाईच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले. कोरोनात (coronavirus) लोकांच्या अंगातील रक्त काढले. नागरिक संकटात असताना दिलासा देण्याचे सोडून महागाई वाढवून हाडातील रक्तही काढले जात असल्याने कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी संताप व्यक्त केला. (Congress-state-president-Nana-Patole-expressed-outrage)

जिल्हा मध्यवर्ती बँकेत बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकार व राज्यातील विरोधकांवर सडकून टीका केली. यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे, आमदार कुणाल पाटील, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, महिला काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, माजी मंत्री वसंत पुरके, मध्यवर्ती बँक अध्यक्ष टिकाराम कोंगरे, किसान काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘आता हाडातील रक्तही काढले जातेय’
चंद्रपुरातील विहीरगाव बिटात आढळा वाघाचा कुजलेला मृतदेह

कोरोनामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. आई-वडिलांच्या मृत्युमुळे चिमुकल्यांचे बालपण करपले. हे सर्व दुसऱ्या लाटेत घडले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत केंद्र सरकारने निष्काळजीपणा केला. त्यापासून धडा घेऊन किमान दुसऱ्या लाटेत तरी देशवासीयांचे हाल होणार नाही, याची दक्षता केंद्राने घ्यायला पाहिजे होती. मात्र, तसे झाले नाही, असेही पटोले म्हणाले.

कोरोनाची दुसरी लाट धडकणार असल्याचे ऑक्टोबरमध्येच सांगण्यात आले होते. मात्र, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली. लगेच पाच राज्यांच्या निवडणुकीत पंतप्रधान दंग झाले. दुसऱ्या लाटेत इंधनाचे भाव वाढवण्यात आले. महागाई वाढवून जनतेचे शोषण केले गेले आणि त्यानंतर काय तर फक्त अश्रू गाळले गेले, असा टोला नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

हे संविधानच संपवायला निघाले

देशात सत्ताधारी आणि महाराष्ट्रात विरोधी पक्षाकडून समाजासमाजांत भांडण लावून वाद निर्माण केले जात आहेत. मराठा, धनगर आरक्षणाचा प्रश्‍न जटिल केला जात आहे. मूळ विषयावर विरोधक बोलत नाहीत. अंधारात सरकार बनविणारे खरे जातीयवादी आहे. संविधानाचा आत्मा न्यायव्यवस्था आहे. सत्ताकाळात काँग्रेसने कधीही सुप्रीम कोर्टाला प्रश्‍न केले नाहीत. केंद्र सरकार संविधानच संपवायला निघाल्याचे नाना पटोले म्हणाले.

‘आता हाडातील रक्तही काढले जातेय’
तुमचा पार्टनर कुटुंबाला पसंत करतो की नाही? असे ओळखा

काँग्रेस पुन्हा उभारी घेईल

महाविकासआघाडीचे काम व्यवस्थित सुरू आहे. सरकारमध्ये कुठलाही वाद नाही. विधानसभा अध्यक्ष असताना आपण केलेले काम जनतेने बघितले आहे. प्रदेशाध्यक्ष असतानाही उत्साह कायम आहे. काँग्रेस पक्षात कोणत्याही प्रकारचे गटतट नाही. आगामी २०२४ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष पुन्हा उभारी घेईल, असा आशावाद पटोले यांनी व्यक्त केला.

(Congress-state-president-Nana-Patole-expressed-outrage)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()