अवघ्या तीन मिनिटांत ओल्या कचऱ्याचे रुपांतर खतात

The Conversion of wet waste in to fertilzer
The Conversion of wet waste in to fertilzer
Updated on

यवतमाळ : आपले शहर स्वच्छ सुंदर राहावे असे सर्वांनाच वाटते मात्र, शहरातील कचऱ्याचा प्रश्न काही केल्या सुटत नाही. आता घरातूनच या समस्येवर तोडगा निघेल, असे खत बनविण्याचे यंत्र यवतमाळच्या तीन तरुणांनी शोधले आहे. हे यंत्र ओल्या कचर्‍यापासून तीन मिनिटांत साडेतेरा किलो खत तयार करते, असा दावा हे यंत्र बनविणाऱ्या तीन इंजीनियर तरुणांनी केला आहे.

विशेष म्हणजे अशा प्रकारचे यंत्र तयार करण्यात या तरुणांना तब्बल 10 वेळा अपयश आले होते. 11 व्या वेळी यश मिळालेल्या या यंत्राचे नाव त्यांनी 'सुपर बीन' असे ठेवले आहे. अनिकेत इंगोले, सुवेध भेले आणि सुरज ओझा अशी हे यंत्र बनविणाऱ्या तिघा युवकांची नावे आहेत.

या यंत्रात मुख्यत्वे ओल्या कचऱ्यापासून खत बनविता येते. घरगुती कचऱ्यासोबतच हॉटेल्स, मंगल कार्यालये या ठिकाणच्याही कचऱ्याचे रुपांतर या यंत्राद्वारे खतात करता येऊ शकते, असा या युवा संशोधकांचा दावा आहे. 2017 मध्ये या तिघा युवकांनी शहरातील 200 घरांचे सर्वेक्षण केले होते. त्यातून एका घरातून सुमारे 65 टक्के म्हणजे रोज साधारणपणे दोन किलो ओला कचरा बाहेर टाकला जातो, हे त्यांच्या लक्षात आले.

त्यावर काय करता येईल, असा विचार त्यांनी सुरू केला. त्यातून या 'सुपर बीन' यंत्राच्या कल्पनेने जन्म घतला. अर्थात सध्या तयार केलेले यंत्र बनविण्यापूर्वी त्यांना 10 वेळा अपयश आले. पण त्यांनी जिद्द सोडली नाही आणि 11 प्रयत्न यशस्वी झाला. सध्या या यंत्राची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे, तसेच यंत्राला पेटंटही मिळाले असल्याचे या तरुणांनी सांगितले.

गांडूळ खत बनण्यासाठी 25 दिवस लागतात मात्र, या यंत्राद्वारे तीन मिनिटांत खत बनते. 13 किलो ओल्या कचऱ्यापासून 13 किलो खत तयार होते. या खताचा कस वाढण्यासाठी त्यात माती आणि गोमूत्राचाही वापर केला आहे. खत यंत्राची तपासणी मान्यवर संस्थेकडून केली असल्याचे या तरुणांनी स्पष्ट केले.

तसेच या यंत्राद्वारे बनविलेल्या खतामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आदी मातीला उपयुक्त घटक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सुपर बिन यंत्र बनवण्यासाठी त्यांना 40 हजार रुपये खर्च आला आहे. लोकांना परवडणाऱ्या किंमतीत हे यंत्र उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()