अमरावतीत कोरोनाचं विक्राळ स्वरूप; अंत्यसंस्कारासाठी रांगा; स्मशानात मृतदेह वेटिंगवर

corona
corona
Updated on

अमरावती : केवळ रुग्णालयेच नव्हे तर आता जीवनाचा अंतिम पडाव असलेल्या स्मशानभूमीतसुद्धा "वेटिंग लिस्ट' सुरू झाली आहे. येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये कोरोनाबाधित मृतदेहांना जाळण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने दररोज जाळण्यासाठी आणण्यात येणाऱ्या मृतदेहांना ताटकळत राहावे लागत आहे. स्मशान संस्थेच्या सुविधांवर सध्या अतिरिक्त ताण पडल्याने दररोज येणाऱ्या कोरोनाच्या मृत शवांच्या अंत्यसंस्कारासाठी जागाच नसल्याचे धक्‍कादायक तसेच विदारक चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

हेही वाचा - रुग्णांना दिलासा! नागपुरातील नॅशनल कँसर इन्स्टिट्यूटमध्ये शंभर बेड्सच्या कोविड रुग्णालयाचं उदघाटन

राज्यातील काही जिल्ह्यांतील स्मशानभूमीत निर्माण झालेले चित्र अमरावतीमध्ये सुद्धा पाहायला मिळेल, यावर अमरावतीकरांचा विश्‍वासच बसणार नाही. मात्र परिस्थिती तशीच गंभीर बनलेली आहे. विशेष म्हणजे सोयीसुविधांच्या बाबतीत अमरावतीच्या हिंदू स्मशानभूमीचा जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात नावलौकिक आहे.

हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी 15 ओटे असून कोविडचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या पार्थिवाचे गॅसदाहिनीमध्ये दहन करण्यात येते. दोन गॅसदाहिन्या असल्या तरी कोरोना मृतांची आकडेवारी सातत्याने वाढत आहे. परिणामी स्मशानभूमीतच तयार करण्यात आलेल्या अस्थायी जागेवर काही कोरोनाबाधितांचे शव जाळण्यात येत आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी 18, बुधवारी 19 तसेच गुरुवारी 6 शव अंत्यसंस्काराच्या वेटिंग लिस्टमध्ये होते. मृतदेहांवर अंत्यसंस्करासाठी जागाच अपुरी पडू लागल्याने संबंधित संस्थेच्या विश्‍वस्तांवर ताण आलेला असून त्यांनी आता प्रशासनाकडे सहकार्य मागितले आहे.

हेही वाचा - अखेर मृत्यूनेच केली त्यांची सुटका; मुलानंतर वडिलांचीही आत्महत्या; अख्ख्या गावात हळहळ

स्मशानभूमीवर ताण आलेला आहे. आम्ही त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. दररोज कोरोना रुग्णांचे शव पाहून मन हेलावत आहे. सध्या दोन गॅस दाहिन्या सुरू असल्या तरी लाकडांची प्रचंड टंचाई आहे. आहेत ती लाकडे ओली आहेत. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून प्रशासकीय सहकार्याची मागणी केली आहे. जसजशी व्यवस्था होईल तसे अंत्यसंस्कार आटोपण्यात येत आहेत.
- ऍड. आर. बी. अटल, अध्यक्ष, हिंदू स्मशान संस्था.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.