विवाह समारंभांमध्ये कोरोनाची पंगत! सुपरस्प्रेडर वाटतात कोरोनाचा प्रसाद; नियमांची पायमल्ली

विवाह समारंभांमध्ये कोरोनाची पंगत! सुपरस्प्रेडर वाटतात कोरोनाचा प्रसाद; नियमांची पायमल्ली
Updated on

यवतमाळ : कोरोनाची दुसरी लाट चिंताजनक स्थितीत आहे. लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळताच विवाह, साक्षगंध, निवडणूक, सभा आदी ठिकाणी प्रमाणापेक्षा जास्त गर्दी झालेली दिसून आली. त्याची परिणती दुसऱ्या लाटेत अवतरली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले. विवाह समारंभाला 25 लोकांचीच परवानगी देण्यात आली आहे. तरीदेखील प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत लग्न समारंभात जणूकाही 'कोरोना'ची पंगत बसत आहे. हे चित्र ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे.

विवाह समारंभांमध्ये कोरोनाची पंगत! सुपरस्प्रेडर वाटतात कोरोनाचा प्रसाद; नियमांची पायमल्ली
‘गेम’ होण्याच्या भीतीपोटी त्यानं केला पिंकीचा खून; हत्याकांडातील दोन्ही आरोपींना अटक

घरातील पहिलं, शेवटच लग्न म्हटले की, उत्साहाला उधाण आलेच समजा. वाटेल तितका खर्च करायला, वधू-वराकडील मंडळी मोकळी. सध्या कोरोनाच्या संकटाने जनजीवन ढवळून निघाले आहे. अशावेळी उत्साहाला 'ब्रेक' देणे आवश्‍यक असताना गावभर पत्रिका वाटल्या जात आहेत. प्रतिष्ठेच्या नावाखाली लोकांची गर्दी जमविली जात असल्याचे दिसते. येथे गेलो तरच कोरोना होणार का, असा विचार करून सहकुटुंब सहपरिवार हजेरी लावली जाते. या गर्दीत एखादा "सुपरस्प्रेडर' कोरोनाचा "प्रसाद' मांडवात वाटत फिरतो आणि घरी गेल्यावर कोरोना आपला रंग दाखवायला सुरुवात करतो. मात्र, नागरिकांचा बिनधास्तपणाच कोरोनाला आमंत्रित करीत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

पोलिसांकडून कारवाईचा फास आवळला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत चार ठिकाणी वधू-वरांच्या नातेवाइकांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे. कोरोना काळात मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत पार पडणारे विवाहदेखील आदर्शवत ठरत आहे.

अधिकारी आपलेच...

गावखेड्यात कसला आला 'कोरोना' असे म्हटले जात होते. आता तर, ग्रामीण भागातील कुटुंबेच्या कुटुंबे कोरोनाबाधित होत आहे. तरीदेखील विवाह समारंभात गर्दी होत आहे. अधिकारी आपल्याच ओळखीचे आहेत. नातेवाईक, मित्र मंडळी आले तर काय बिघडते, असा सूर वधू-वराकडील मंडळी आवळताना दिसतात. गर्दी झालीच आहे, सगळेच गेले आपण नाही गेलो तर बरे दिसणार नाही. म्हणून गावकरीही हजेरी लावताना दिसतात.

विवाह समारंभांमध्ये कोरोनाची पंगत! सुपरस्प्रेडर वाटतात कोरोनाचा प्रसाद; नियमांची पायमल्ली
यंदाचाही सीझन असाच जाणार का? लॉकडाउनमुळे क्रीडा साहित्यांची विक्री करणारे चिंतेत

कोरोनाचा आशीर्वाद

विवाह समारंभाला आलेली मंडळी वधू-वरांना आशीर्वाद दिल्याशिवाय जात नाही. "सुपर स्प्रेडर'ही दूर राहत नाही. तोदेखील जवळ जातो आणि अप्रत्यक्षरीत्या कोरोनाचा आशीर्वाद देऊन मोकळा होतो. आठवडाभराच्या आतच वधू-वरांसह वऱ्हाडींना रुग्णालयाची वारी करावी लागते. मात्र, विवाह समारंभात काय घडलं, याची कुणीही फार चर्चा करताना दिसत नाही.

संपादन - अथर्व महांकाळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()