कोरोनाचा आलेख चढताच, खाटा उपलब्ध असतानाही रुग्णांची गैरसोय

corona patients facing problems even beds are available in yavatmal
corona patients facing problems even beds are available in yavatmal
Updated on

यवतमाळ : दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयातील खाटांची मागणी पण वाढली आहे. असे असले तरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेड उपलब्ध आहेत. जिल्हा प्रशासनाने शासकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये, कोवीड सेंटर अशा सर्व ठिकाणी दोन हजार 699 खाटांचे नियोजन करून ठेवले आहे. सद्यस्थितीत एक हजार 255 रुग्ण असून एक हजार 274 खाटा उपलब्ध आहेत.

गेल्या महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. जिल्ह्यात दररोज चारशे रुग्णांच्या वर पॉझिटिव्ह रुग्ण येत आहेत. जिल्ह्यात सध्या दोन हजार 524 ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीला असलेल्या स्थितीत आता सुधारणा झाली आहे. 18 टक्के असलेला पॉझिटिव्हीटीचा दर आता आठ टक्‍यापर्यंत खाली आला आहे. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात दररोज सरासरी चारशे रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांना शासकीय महाविद्यालये, कोवीड सेंटर, खासगी रुग्णालय याठिकाणी दाखल केले जात आहे. त्यामुळे खाटांची मागणी वाढली आहे. असे असले तरी पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह रुग्णांची संख्याही मोठी आहे. परिणामी जिल्ह्यात सध्यातरी खाटांचा तुटवडा नाही. जिल्हा प्रशासनाने वाढत्या रुग्णसंख्येचा आकडा विचारात घेता मोठ्याप्रमाणात नियोजन केले होते. जिल्ह्यात आसीयू, ऑक्‍सिजन तसेच जनरल बेडचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात सर्व बेडची संख्या दोन हजार 699 आहे. यातील एक हजार 255 रुग्ण दाखल असून अजूनही एक हजार 274 खाटा शिल्लक आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये, कोवीड केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालये अशा 40 ठिकाणी खाटा उपलब्ध आहे. प्रशासनाचे नियोजन व्यवस्थित असल्याने रुग्ण संख्या वाढत असली तरी खाटांचा तुटवडा नाही.

खाटा  एकूण खाटा वापरातील खाटा शिल्लक खाटा
आयीयू बेड 189 94 95
 
ऑक्‍सिजन 824 339 525
साधारण 1686 822 714
एकूण 2699 1255 1274

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()