दिग्रस (जि. यवतमाळ): आम्हाला कोरोना (Corona virus) होऊच शकत नाही. आम्ही दररोज एक कप गावठी दारू (Desi wine) पितो. 120 रुपये किलोचे मोह त्यासाठी विकत आणतो. दारू प्याल्याने कोरोना होत नाही, असा अजब दावा तालुक्यातील आनंदवाडी येथील महिलांनी केला आहे. (Corona will only cured after drinking desi wine daily women claimed)
दिग्रस शहरापासून 17 किलोमीटर अंतरावर आनंदवाडी साडेतीनशे लोकवस्तीचे गाव आहे. या गावात एकही कोरोनाबाधित नाही. विशेष म्हणजे, गावातील लोक मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतराचे पालन करत नाहीत. येथे पारधी बांधव एकोप्याने राहतात. सर्व आनंदी देवीचे भक्त आहेत. म्हणूनच या गावाला आनंदवाडी असे नाव पडले. तहसीलदार राजेश वजीरे सांगतात की, कोरोना तपासणीचे दोन वेळा आनंदवाडीत कॅम्प लावण्यात आले. मोठ्या कसरतीने 17 लोक तपासणीसाठी पुढे आले. ते सर्व निगेटिव्ह निघाले.
तपासणी म्हटले की, अनेक लोक घाबरून पळून जातात. तर काही शेतात लपून बसतात. हा विचित्र अनुभव आल्याने प्रशासनातील एकही अधिकारी, डॉक्टर, सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील हे पुन्हा आनंदवाडीत चाचणी करू शकले नाही. लसीकरण झाले नाही. गावात 'सकाळ'च्या बातमीदाराने प्रत्यक्ष भेट देऊन वास्तव जाणून घेतले, त्यावेळी गावकऱ्यांनी कोरोनावर शोधलेला उपाय ऐकून आश्चर्य वाटले.
येथील प्रत्येक वृद्ध, तरुण, महिला व मुलेदेखील दररोज मोहाची दारू कोरोनावरील औषध म्हणून पितात. 'सकाळी व रात्री दोनवेळा औषध म्हणून आम्ही घेतो, आम्हाला कोरोना होत नाही. त्यामुळेच आम्ही लससुद्धा घेणार नाही' असे ग्रामस्थ निर्धास्तपणे सांगत आहेत. एकवेळचे जेवण नसले तरी चालेल, परंतु 120 रुपये किलोचे मोह आणून घरीच त्याची दारू काढून ती घेतली जात आहे. यावरून गावाचे काय भवितव्य असेल हे दिसून येते. या गावातील चालीरीती विषयी मनोज या युवकाशी संवाद साधला असता त्यांनी कोरोना होऊ नये, म्हणून देवीला बोकडाचा नवसदेखील दिल्याचे सांगितले.
कोरोना विषयी गैरसमज : तहसीलदार वजीरे
आनंदवाडीतील लोकांनी अज्ञान व अंधश्रद्धमुळे कोरोनाविषयी गैरसमज करून घेतला आहे. पूर्वी तेथे ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. आठ दिवसांपूर्वी कॅम्प घेण्यात आला. 17 लोकांची तपासणी केली, ते सर्व निगेटिव्ह आले. गावातील सर्वांचीच चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार राजेश वजीरे यांनी दिली.
(Corona will only cured after drinking desi wine daily women claimed)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.