यवतमाळ : दोन वर्षांत कोरोना विषाणूंच्या (coronavirus) गर्तेत राज्यातील शेतकरी आत्महत्येची (farmers suicide) धग कधी विरली कळलेच नाही. कोविडच्या संकटात शेतकरी आत्महत्यांसारखा गंभीर विषयही मागे पडला. त्यावर कुणी शेतकरी नेता बोलताना दिसत नाही, सरकारही आता याकडे गांभीर्याने बघत नसल्याचे दिसून येते.
२०१९ मध्ये कोरोनामुळे पहिले लॉकडाउन झाले. लॉकडाऊनमुळे सर्वांचे लक्ष रुग्णालयांकडे व भरती असलेल्या रुग्णांकडे होते. प्रशासन उपाययोजनेत गुंतले असताना किती शेतकऱ्यांनी जीवनयात्रा (farmers suicide) संपविली याकडे ना माध्यमांचे लक्ष होते ना सरकारचे. दोन वर्षांत एकट्या यवतमाळ जिल्ह्याचा विचार केल्यास ५२५ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. परंतु, याकडे कुणाचे फारसे लक्ष गेले आहे. शेतकरी आत्महत्येची धगही कोविडच्या गर्तेत विरत गेली.
२० वर्षांपासून सुरू झालेले शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही आहे. शेती तोट्यात आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाचे प्रयत्न तोकडे पडत आहे. वीस वर्षांत पाच हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यापैकी केवळ तीन हजार शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबे शासनाच्या मदतीस पात्र ठरले आहेत.
जून, जुलै व ऑगस्ट या पेरणीच्या काळातच शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होतात. अलीकडे महागाईने उच्चांक गाठला आहे. त्याचा परिणामही ग्रामीण जीवनावर झाला आहे. त्यात कोविडमुळे वारंवार आचारसंहिता लागत असल्यानेही ग्रामीण जीवन प्रभावित झाले आहे. यात शेतकरी भरडला जात आहे. शेतमालाला भाव मिळत असला तरी महागाईने खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे शेतीतील तोटा कमी झाला नाही.
नैसर्गिक संकटे सतत सुरूच असतात. ती कमी होण्याचे नाव घेत नाही. ऐन काढणीच्या वेळी यंदा परतीच्या पावसाने सोयाबीनचा मातेरा केला. तर ढगाळ वातावरणाने तूर जाळली. त्यामुळे पिकांवर दुष्परिणाम होत आहे. सर्वाधिक संकटे शेतकऱ्यांच्या वाट्याला येत आहेत. त्यामुळे विदर्भातील शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढत आहे. कोविडच्या संकटामुळे मात्र या विषयाकडे दुर्लक्ष होत आहे. तर अपात्र ठरलेल्या शेतकरी कुटुंबाची मात्र फरफट होत आहे. अशा कुटुंबांना उभे करण्यासाठी कंपन्यांनी सीएसआर फंड वापरल्यास त्यांचे जीवन सुकर होईल.
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी
महिना - 2019 -2020 -2020
जानेवारी -12-18-20
फेब्रुवारी -27-25-26
मार्च -15-13-24
एप्रिल -19-17-19
मे -17-31-22
जून -15-26-23
जुलै -25-34-25
ऑगस्ट -38-44-29
सप्टेंबर -30-35-28
ऑक्टोबर -28-28-23
नोव्हेंबर -27-27-31
डिसेंबर -29-21-06
दोन हजार कुटुंब मदतीस पात्र
२००१ ते २००६ या कालावधीत यवतमाळ जिल्ह्यातील ७७६ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा (farmers suicide) संपविली आहे. त्यापैकी ३८४ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब मदतीस पात्र ठरले तर ३९२ अपात्र ठरले. २००७ ते २०१४ या कालावधीत तब्बल २,२७९ आत्महत्यांनी उच्चांक गाठला होता. त्यात ८०३ मदतीस पात्र, तर १४७६ अपात्र ठरले. २०१५ ते २०१६ मध्ये ६५८ आत्महत्या झाल्या. त्यात ३५५ पात्र व ३०३ अपात्र ठरले. २०१७ मध्ये २४२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. ८६ पात्र तर १५६ अपात्र ठरले. २०१८ मध्ये २५५ आत्महत्या झाल्या. त्यात केवळ ६१ पात्र व १८४ अपात्र ठरविण्यात आले. २०१९ मध्ये २८८ आत्महत्या झाल्या होत्या. त्यात १०१ मदतीस पात्र तर १८७ अपात्र ठरले.
कोरोना काळात ५२५ शेतकरी आत्महत्या
कोरोना काळात (coronavirus) २०२० मध्ये ३१९ आत्महत्या झाल्या. त्यात १३९ पात्र तर १८० अपात्र ठरले. २०२१ मध्ये २७६ आत्महत्यांची नोंद आहे. त्यात १०९ पात्र व १२८ अपात्र आहेत. वीस वर्षांच्या काळात केवळ दोन हजार ३८ शेतकरी कुटुंब मदतीस पात्र ठरले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.