यवतमाळ : जागतिक बाजारात कापसाचे भाव वाढले आहेत. कापसाच्या दरात गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा कापसाला साडेसहा हजारांच्या पुढे खासगी बाजारात दर राहण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दरात थोडे ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता आहे.
यंदा कापसाची लागवड शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायद्याची ठरण्याची शक्यता आहे. शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त दर कापसाला मिळण्याचे संकेत तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. भारतीय कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असते. कापसाची मागणी वाढली तर दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सध्या कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही चांगली बाब असली तरी अजून शेतकऱ्यांचा कापूस बाजारात आलेला नाही. शेतकऱ्यांचा कापूस निघाल्यानंतर हेच दर राहिल्यास काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कापूस पिकाला लागणार खर्च तसेच कापसाला असलेला भाव यात बरीच तफावत आहे.
जागतिक बाजारात कापसाचे भाव वाढल्यानंतर देशातील कापसाच्या किमती किमान आधारभूत किमतीपेक्षा १५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. यंदा कापसाचा एमएसपी सहा हजार २५ रुपये निश्चित केला आहे. गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये कापसाचे दर साडेसहा हजार ते सात हजार रुपये आहे. राज्यातही दरात वाढ झाली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्यावर्षीच्या तुलनेत निश्चितच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या कापूस पीक चांगल्यास्थितीत आहे. मोठ्या प्रमाणात कापूस शेतकऱ्यांच्या घरात आल्यास शेतकऱ्यांना फायदा होण्याचे संकेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.