यवतमाळ : बाबाजी दाते महिला बँक घोटाळ्यातील आरोपींची पोलिस कोठडी शुक्रवारी (ता. २०) संपली. त्यामुळे सातही आरोपींना न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
बाबाजी दाते महिला बँकेत झालेल्या २४२ कोटींच्या घोटाळ्यात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये बँकेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुजाता महाजन, विलास महाजन, अॅड. वसंत मोहर्लीकर, नवलकिशोर मालाणी, प्रकाश पिसाळ, प्रशांत पामट्टीवार, रमेश अगरवाल यांचा समावेश आहे. पहिल्यांदा अटक केलेल्या चौघांना शुक्रवारपर्यंत (ता. २०) पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. तर तीन दिवसांपूर्वीच आणखी तिघांना ताब्यात घेतले होते. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा सातही आरोपींना पोलिस कोठडी मिळविण्याकरिता न्यायालयात हजर केले.
मात्र, सातही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस कोठडी दरम्यान पोलिसांना अपेक्षित असलेली माहिती मिळाली की नाही, हे गुलदस्त्यातच आहे.
फरार आरोपी पोलिसांच्या रडारवर
बँकेच्या घोटाळ्यात तब्बल दोनशेहून अधिक लोकांवर गुन्हे दाखल झाले आहे. सध्या केवळ सात आरोपी अटकेत आहेत. उर्वरित आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहेत. सर्व आरोपींना चौकशीकरिता पोलिसांनी समज दिला. तरीसुद्धा काही आरोपींनी पोलिस ठाण्यात हजेरी लावलीच नाही. शेवटी सर्वच आरोपी पोलिसांच्या रडारवर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.