Court News:चंद्रपूरमध्ये ११ जणांना चुकीच्या पद्धतीने अटक, कोर्टाला मागावी लागली माफी... नुकसान भरपाईसह दिले 'हे' आदेश

Latest Crime News:नायब तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी पीडित व्यक्तींची लेखी माफी मागावी
Court News:चंद्रपूरमध्ये ११ जणांना चुकीच्या पद्धतीने अटक, कोर्टाला मागावी लागली माफी... नुकसान भरपाईसह दिले 'हे' आदेश
Updated on

Nagpur Court News: चंद्रपूर जिल्हाधिकारी, नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व ग्ली इंडिया रियल इस्टेट ॲण्ड फायनान्स कंपनीचे अवसायक यांच्या बेजबाबदारपणामुळे पोलिसांनी ११ निष्पाप व्यक्तींना अटक करून न्यायालयात हजर केले.

Court News:चंद्रपूरमध्ये ११ जणांना चुकीच्या पद्धतीने अटक, कोर्टाला मागावी लागली माफी... नुकसान भरपाईसह दिले 'हे' आदेश
Supreme Court: 'जामीन हा नियम तर तुरुंगवास हा अपवाद', मुलभूत हक्कांबाबत कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

अवैध अटक कारवाई झाल्याचे लक्षात आल्याने झालेली पीडा लक्षात घेता, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या सर्वांची माफी मागितली व यासाठी शब्दही अपुरे पडत असल्याची भावना व्यक्त केली. तसेच, अटक कारवाईमुळे झालेल्या अवमान व मन:स्तापासाठी केवळ माफी मागणे पुरेसे ठरणार नाही, असे स्पष्ट करून प्रत्येकी एक-एक लाख रुपये आर्थिक नुकसानभरपाईचा आदेश दिला.

न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी हा निर्णय दिला. पीडित व्यक्तींमध्ये शांतीदेवी नारायण आसोफा, सुनील रत्नाकर भोयर, अनिल रत्नाकर भोयर, संजय रत्नाकर भोयर, दमयंती रत्नाकर भोयर, हर्षद माधव मानमपल्लीवार, पुष्पा माधव मानमपल्लीवार, वासुदेव रामजी वानकर, बंडू कवडू चोपडे, लक्ष्मी नागा यल्लया कोमू व मालनबाई मनोहर कासवटे यांचा समावेश आहे. भरपाईची रक्कम जिल्हाधिकारी व कंपनी अवसायक यांनी अर्धी-अर्धी अदा करायची आहे. त्यासाठी त्यांना ३० ऑगस्टपर्यंत वेळ देण्यात आला.

Court News:चंद्रपूरमध्ये ११ जणांना चुकीच्या पद्धतीने अटक, कोर्टाला मागावी लागली माफी... नुकसान भरपाईसह दिले 'हे' आदेश
Supreme Court : 'कोणी कपाळावर टिळा लावला म्हणून....'; मुंबईतील खासगी कॉलेजमधील हिजाब बंदीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

याशिवाय, न्यायालयाने नायब तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी पीडित व्यक्तींची लेखी माफी मागावी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून ३० ऑगस्टपर्यंत अहवाल द्यावा, असे निर्देश दिले. जिल्हाधिकारी, नायब तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना न्यायालयाने भरपाईची रक्कम त्यांच्या वेतनातून का वसूल केली जाऊ नये? अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीसही बजावली व यावर ३० ऑगस्टपर्यंत स्पष्टीकरण मागितले.

Court News:चंद्रपूरमध्ये ११ जणांना चुकीच्या पद्धतीने अटक, कोर्टाला मागावी लागली माफी... नुकसान भरपाईसह दिले 'हे' आदेश
Supreme Court : सर्वोच्च आदेशांमुळे राज्यांचे अधिकार वाढले,एससी-एसटी प्रवर्ग एकसंघ नसल्यावरही मोहोर; पंधराव्या अन् सोळाव्या कलमावर मंथन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.