Murder Crime : पैशाच्या वादातून मामाने केला भाच्याचा खून,आरोपी मामाला अटक...बारा तासांत खूनाचा छडा

Murder Case : पैशाच्या वादातून चुलत मामाने भाच्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. उमरखेड पोलिसांनी अवघ्या बारा तासांत या खूनाचा छडा लावून आरोपीला अटक केली.
Murder Crime unmarked washim
Murder Crime
Updated on

उमरखेड : पैशाच्या वादातून चुलत मामानेच आपल्या भाच्याचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. उमरखेड पोलिसांनी अवघ्या बारा तासांत खून प्रकरणाचा छडा लावून आरोपी चुलत मामाला अटक केली.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथील जिल्हा परिषद कॉलनीमध्ये राहणारा सुमित प्रभाकर सोळंके (वय२३) हा शनिवारी (ता.१२) सकाळी नऊ वाजतापासून घराबाहेर गेला, तो परत आलाच नसल्याची तक्रार त्याचे काका रतिराव सोळंके यांनी रविवारी (ता.१३) पोलिसांत केली.

पोलिस त्याचा शोध घेत असताना चुरमुरा शेत शिवारातील जंगलामध्ये एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांनी मिळाल्यावरून पोलिसांनी घटनास्थळाला गाठले. हा मृतदेह सुमितचा असल्याची ओळख पटली. चुरमुरा रोडपासून सुमारे १०० मीटर अंतरावर जंगलात सुमीत याचे प्रेत रक्ताने माखलेल्या अवस्थेत होते. त्याच्या मानेवर व गळ्यावर कापल्याच्या जखमा दिसल्या. कुणीतरी त्याचा खून केल्याचे दिसत असल्याने रतेराव सोळंके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शोध मोहीम चालू केली.

दरम्यान, गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेता अपर पोलिस अधीक्षक पियूष जगताप यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन महत्त्वपूर्ण सुचना दिल्या. उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड व ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या आदेशाने वेगवेगळ्या टीम तयार करून त्या रवाना करण्यात आल्या.

यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ हे पथकसुद्धा तपासकामी लागले. तपासादरम्यान मृत सुमित हा त्याचा चुलत मामा संदीप अवधुत जगताप (रा. नेर, ता. माहूर) याच्या दुचाकीवर बसुन जाताना दिसल्याने त्याच्यावर संशय बळावला. त्याला ताब्यात घेण्यासाठी एक टीम नेर (ता. माहूर) येथे रवाना केली.

संदीप जगताप हा सुमितच्या अंत्यविधीसाठी आला आहे, अशी माहिती मिळाल्याने त्याला महागाव रोडवरूनच ताब्यात घेतले. सुरूवातीला त्याने उडवाउडविची उत्तरे दिल्ली. परंतु विश्वासात घेऊन विचारणा केली असता संदीपने गुन्ह्याची कबुली दिली. मामा संदीप जगताप याने सुमितला पैशाच्या वादातून धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. पुढील तपास सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.