हिंगणा - गुरे चारायला गेलेल्या गुराख्यावर पट्टेदार वाघाने अचानक हल्ला करून जखमी केले. ही घटना शनिवारी (ता.१४) दुपारी तीन वाजताच्या सुमारास सुकळी (कलार) शिवारात घडली. मात्र या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे. .सुरेश दमडू कंगाली (वय ६०) असे या जखमी गुरख्याचे नाव असून तो व याच गावातील त्याचा मित्र देवीदास शामराव कुळमते (५५) हे दोघेही आपापली गुरे चारायला घेऊन सुकळी ते नांदेरा मार्गाकडे शिवारात गेले होते. काही अंतरावर दोघांनी जनावरे चरायला सोडली व उभे असताना अचानक वाघाने सुरेशवर हल्ला केला.अचानक झालेल्या हल्ल्याने तो ओरडला. वाघाने सुरवातीला त्याच्या डोक्यावर पंजा मारला व दुसरा पंजा मारून मानेकडे तोंड करताच सुरेशने एका हाताने त्याचा पंजा पकडला व दुसऱ्या हातात असलेल्या दांड्याने वाघाच्या तोंडावर एक फटका मारला. तोच वाघ थोडा मागे गेला..इतक्यात ओरडण्याचा आवाज ऐकून देविदाससुद्धा काठी घेऊन तिथे आला. आता दोघांना बघताच वाघ तेथून पळून गेला. मात्र दरम्यान सुरेशच्या डोक्यावर वाघाच्या पंजाच्या नखाने दोन तीन खोल जखमा झाल्या होत्या.वाघ बराच लांब गेल्याचे लक्षात आल्यावर सुरेशला एका झाडाखाली बसवून देविदास मदतीसाठी धावत गावात आला. त्यानंतर गावकरी सुद्धा घटनास्थळी पोहचले. जखमीला तत्काळ डिगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले..त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वनविभागागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हिंगणा वनपरिक्षेत्र अधिकारी रिना राठोड, क्षेत्र सहायक आनंद तिडके, वनरक्षक सागर गोमलाडू, सचिन इंगोले, पूजा बावनथळे यांनी सुद्धा रुग्णालयात जाऊन माहिती घेतली.जखमी सुरेशने तो पट्टेदार वाघ असल्याचे सांगितले. त्यानंतर या परिसरात सुद्धा शोध मोहीम सुरू करणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांनी सांगितले. तसेच या भागातील नागरिकांनी सुद्धा काळजी घ्यावी व रात्री अपरात्री एकटे शिवारात जाऊ नये, असे आवाहन केले आहे. या वाघाला वनविभागाने तत्काळ पकडण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.या परिसरात मागील काही दिवसांपासून वाघाचा आवाज येत असल्याचे सुद्धा शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दोन दिवसांपूर्वी याच गुराख्याची एक बकरी सुद्धा मारल्याचे गावकरी सांगतात..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.