हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

कारंजा परिसरातील एव्हरग्रीन हॉटेलमध्ये एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्नSakal
Updated on

गोंदिया : कारंजा परिसरातील एव्हरग्रीन हॉटेलमध्ये एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला उपचारसाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी ( ता. १८) घडली.

संबंधित युवक फुलचूर येथील रहिवासी आहे. तो बेशुध्द असून त्याच्यावर गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. एव्हरग्रीन या हॉटेलमध्ये नागपूरच्या एका तरूणाने आपल्या प्रेयसीसोबत रात्र घालवून रात्रीच विषप्राशन करून दोघांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर आमगावच्या बजरंग चौकात राहणाऱ्या २१ वर्षाच्या तरूणाने आमगावातील एका २० वर्षाच्या तरूणीवर अटी केला होता. या दोन्ही घटनांची नोंद गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात आहे. आता एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याच्या आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागील कारण काय हे कळू शकले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.