बहिणीवर चाकूहल्ला करून भावाचा आत्महत्येचा प्रयत्न

बहिणीने आपल्या घरी वाढवलेल्या भाच्याचे परस्पर लग्न उरकून टाकले. यावरून मुलाच्या आईवडिलांनी तिच्यासोबत वाद घातला. यात भावाने बहिणीला चाकूने मारून गंभीर जखमी केले
crime news Bhandara Brother attempts suicide stabbing sister family dispute  Lakhandur
crime news Bhandara Brother attempts suicide stabbing sister family dispute Lakhandur esakal
Updated on

लाखांदूर : बहिणीने आपल्या घरी वाढवलेल्या भाच्याचे परस्पर लग्न उरकून टाकले. यावरून मुलाच्या आईवडिलांनी तिच्यासोबत वाद घातला. यात भावाने बहिणीला चाकूने मारून गंभीर जखमी केले. मात्र, पोलिस कारवाईच्या धास्तीने त्याने सोमवारी सकाळी आत्महत्येचा प्रयत्न केला. आरोपी भावाचे नाव गोविंदा अर्जुन कांबळे (वय ५५) असून, जखमी बहिणीचे नाव मैना दादाजी चंडीमेश्राम (वय ६०, रा. जुनोना) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांढळ येथील गोविंदा कांबळे याचा मुलगा महेश १४ वर्षांपासून त्याची जुनोना (ता. पवनी) येथील आत्या मैना चंडीमेश्राम यांच्याकडे राहत होता. दरम्यान, मैना चंडीमेश्राम यांनी महेशचे लग्न करून दिले. मात्र, यासंबंधात मुलाच्या आईवडिलांना कोणतीही विचारपूस केली नाही. १५ मे रोजी मांढळ येथे वास्तुपूजनासाठी मैनाबाई आल्या असताना गोविंदा व त्याच्या पत्नीने भांडण केले. तसेच रागाच्या भरात बहिणीच्या पाठीत चाकूने वार करून गंभीर जखमी केले.

या घटनेची लाखांदूर पोलिसांत तक्रार करण्यात आली. आता आपल्यावर पोलिस कारवाई करणार म्हणून धास्तावलेल्या गोविंदा कांबळे याने आज सकाळी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी त्याला लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले आहे. ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार दिलीप भोयर व पोलिस अंमलदार अनिल राठोड तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.