भंडारा : महिलेचा संशयास्पद मृत्यू, पतीने घेतले विष

अत्यवस्थ पतीवर भंडारा येथे उपचार सुरू; पळसपाणी गावातील घटना
crime update Suspicious death of woman poison taken by husband bhandara
crime update Suspicious death of woman poison taken by husband bhandarasakal
Updated on

साकोली : पळसपाणी येथे रविवारी घरातच महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर तिच्या पतीने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. साकोली पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. मृताचे नाव पपीता चरणदास राऊत (वय ३२) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकोली तालुक्यातील पळसपाणी येथे चरणदास, त्यांची पत्नी पपीता आणि तीन वर्षांची मुलगी राहत होते. चरणदास राऊत हा रविवारी दुपारी जेवण आटोपून घरी आराम करत होता. त्यानंतर तो बाहेर गेला. दरम्यान, दुपारी चार वाजताच्या सुमारास चरणदास यांच्या आईला मधल्या खोलीत पपिता चटईवर बेशुद्ध अवस्थेत दिसली. त्यांनी आरडाओरड करून शेजाऱ्यांना बोलावले.

चरणदासची आई व गावकऱ्यांनी पोलिस पाटलांच्या मदतीने या घटनेची माहिती साकोली पोलिसांना दिली. पोलिसांनी पपीताला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. यानंतर पोलिस व कुटुंबीयांनी चरणदास याचा शोध घेतला. चरणदास राऊत हा एकोडी/किन्ही येथे बहिणीच्या घरी पळून गेला होता. तेथे त्याने कीटकनाशक औषध घेतल्याने त्याची प्रकृती बिघडली. पोलिसांनी त्याला बहिणीच्या घरून उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. आज, पपीताच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक जितेंद्र बोरकर व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.

पपीता तिसरी पत्नी

पपीतासोबत चरणदास याचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. ती त्याची तिसरी पत्नी आहे. त्यांना तीन वर्षांची एक मुलगी आहे. पपीताचा अचानक मृत्यू आणि पतीने विष घेतल्यामुळे परिसरात शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()