गुन्हेगाराने घातला ऑटोचालकाशी वाद, पोलिसांनी केली मध्यस्थी आणि...

The Criminal argumented with police
The Criminal argumented with police
Updated on

अमरावती : अमरावती जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून, सऱ्हाईत गुन्हेगार दिवसाढवळ्या चक्‍क नागरिकांसमोर गोंधळ घातल असल्याचे दिसून येते. असाच प्रकार शुक्रवारी इर्विन रुग्णालयाच्या परिसरात घडल्याने रुग्णांचे नातेवाईक तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये धडकी भरली आहे. चोरी, खिसे कापण्यासारखे अनेक गुन्हे दाखल असलेल्या सऱ्हाईत गुन्हेगाराने शुक्रवारी (ता. 17) जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात धुमाकूळ घातला. ऑटोचालकाशी सुरू असलेला वाद मिटविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला असता, धुमाकूळ घालणाऱ्याने पोलिसांसोबतच झटापट केली.

एजाजउद्दीन निजामुद्दीन ऊर्फ हनुमान (वय 32, रा. अलीमनगर) असे धुमाकूळ घालणाऱ्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. तमीज खान (वय 28) नामक ऑटोचालक काही प्रवाशांना घेऊन दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात पोचला. प्रवासी उतरल्यानंतर एजाजउद्दीन ऊर्फ हनुमान याने ऑटोचालकासोबत वाद घातला. त्याने शिवीगाळ करायला सुरुवात केली.

हातात असलेला दगड पोलिस वाहन व ऑटोच्या दिशेने भिरकविण्याचा प्रयत्न केला, त्याचवेळी रुग्णालयात पोलिस मुख्यालयाचे कर्मचारी वाहनातून इर्विन परिसरात आले होते. त्यांनी धुमाकूळ घालणाऱ्या एजाजउद्दीनला पकडले असता, त्याने त्याच पोलिसासोबत वाद घातला. शिवीगाळही केली.

काही कारण नसताना पोलिसांसोबत झटापट करीत असल्याचे लक्षात येतात, इर्विनच्या पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. दहा ते पंधरा मिनिटानंतर एजाजउद्दीनला आटोक्‍यात आणून, पोलिसांच्या जीपमध्ये बसविले, झटापटीत एक पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. परंतु एजाजउद्दीनला आटोक्‍यात आणत असताना, ही घटना घडल्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बचाटे यांनी सांगितले. ऑटोचालक व धुमाकूळ घालणाऱ्या एजाजउद्दीन यांना कोतवाली ठाण्यात आणण्यात आले, असे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

इर्विनसमोर पोलिस बंदोबस्ताची मागणी

इर्विन रुग्णालयात रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची सतत ये-जा असते. बाहेर ऑटोचालक तसेच खाजगी वाहनचालकांची गर्दी असते. त्यामुळे लहानसहान वाद परिसरात होतच असतात. कधी कधी साध्या साध्या गोष्टींवरून वाद विकोपाला जातो. त्यामुळे या रुग्णालयासमोर पोलिस बंदोबस्त असावा तसेच शहरातील गुन्हेगारीवर पोलिसांनी जरब बसवावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

संपादित : अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.