बिग ब्रेकिंग: अमरावतीत रविवारी संचारबंदी; जिल्हा प्रशासनाचा निर्णय; कोरोनाबाधितांमध्ये वाढ

Curfew in Amravati on sunday on increasing corona
Curfew in Amravati on sunday on increasing corona
Updated on

अमरावती : कोरोनाबाधितांचा आकडा जिल्ह्यात सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने आता कठोर उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार शनिवारी रात्री आठ वाजेपासून तर सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. 

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज ही माहिती दिली. शुक्रवारपासून (ता.१९) रात्री आठ वाजतानंतर एकही आस्थापना सुरू राहणार नाही. जिल्ह्यातील सर्व जलतरण तलाव तसेच इनडोअर गेम बंद करण्यात येणार असून धार्मिक समारंभाला केवळ पाच जणांना उपस्थित राहण्याची मर्यादा घालून देण्यात आली आहे. दर आठवड्याला शनिवारी सायंकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत बाजारपेठा व सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.

महानगरातील कोरोना संक्रमितांची वाढती संख्या बघता गृहविलगीकरण टाळून संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. फेरीवाले व भाजीविक्रेत्यांची चाचणी करण्यात येणार असून क्वारंटाइन सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विदर्भ महाविद्यालयातील केंद्र येत्या दोन-तीन दिवसांत सुरू होण्याची शक्‍यता आहे.

होम आयसोलेशन कठोर करणार

आतापर्यंत आढळून आलेल्या जवळपास 90 टक्के कोरोना रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याची सवलत देण्यात आली होती, मात्र अनेकांनी या सवलतीचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाल्याने प्रशासनाने आता कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांना होम आयसोलेशनऐवजी रुग्णालयात उपचार करण्यासाठी बाध्य केले जाणार असल्याचे समजते.

असा आहे कोरोनाचा चढता ग्राफ

1 फेब्रुवारी 92
2 फेब्रुवारी 118
3 फेब्रुवारी 179
4 फेब्रुवारी 158
5 फेब्रुवारी 233
6 फेब्रुवारी 199
7 फेब्रुवारी 192
8 फेब्रुवारी 236
9 फेब्रवारी 183
10 फेब्रुवारी 359
11 फेब्रुवारी 315
12 फेब्रुवारी 369
13 फेब्रुवारी 376
14 फेब्रुवारी 399
15 फेब्रुवारी 449
16 फेब्रुवारी 485
17 फेब्रुवारी 498 

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()