वर्ध्यात जमावबंदी लागू, ५ पेक्षा अधिकजण एका ठिकाणी जमल्यास होणार कारवाई

curfew imposed in wardha due to increasing corona cases
curfew imposed in wardha due to increasing corona cases
Updated on

वर्धा : वर्ध्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी वर्ध्यामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यामध्ये ५ पेक्षा अधिक जणांना एका ठिकाणी जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच औषधांची दुकाने आणि जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच बाबींवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच बाजारपेठा देखील सायंकाळी ६ नंतर सुरू ठेवता येणार नसल्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

विदर्भात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर आणि वर्ध्यात कोरोनाचा रुग्णांचा आकडा दिवसागणिक फुगतच चालला आहे. लग्नसमारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांमधून कोरोनाचा प्रसार जास्त प्रमाणात होत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच नागरिकांकडून देखईल लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे कोरोनाचा आकडा वाढत आहे. त्यासाठी वर्ध्यात जमाबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. यामध्ये ५ व्यक्तींपेक्षा अधिक जण एका ठिकाणी जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच लग्नसमारंभात ५० पेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित राहिल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसेच मास्क न लावणा ऱ्यांवर दंड आकारण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.