लिंकवर क्लिक करताच खात्यातून ६६ हजार लंपास, गुन्हा दाखल

cyber crime
cyber crimeMedia Gallery
Updated on

अमरावती : सायबर गुन्हेगारांकडून (cyber crime amravati) फसवणुकीची मालिका सुरूच असून शनिवारी (ता. 24) एका युवकाच्या बँकखात्यातून दोन वेळा 66 हजार रुपये तोतयांनी उडविले. पंकज सुभाष राऊत (वय 29, रा. शेंदूरजनाघाट), असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. या युवकाच्या तक्रारीवरून शेंदूरजनाघाट पोलिसांनी (shendurjanaghat police amravati) तोतयाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. (cyber fraud of 66 thousand with man in amravati)

cyber crime
नाना पटोले फडणवीसांच्या मतदारसंघावर करणार दावा?

बरेचजण ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी उपलब्ध असलेल्या अ‍ॅपचा वापर करतात. राऊत यांच्या भ्रमणध्वनीवर काही दिवसांपूर्वी अनोळखी व्यक्तीने संपर्क साधला. संपर्क साधणाऱ्याने फोन पे कंपनीकडून कॅशबॅक मिळाली आहे. त्यामुळे फोन पे उघडून त्यावर दिलेल्या लिंकवर क्लिक करण्याचा सल्ला दिला. पंकज यांच्या फोनवर पुन्हा दोन ते तीन लिंक असलेले मेसेज आले. पंकजने त्यावर क्लीक करताच त्यांच्या एका बँक खात्यामधून 26 हजार रुपयांची रोख रक्कम परस्पर दुसऱ्या खात्यात वळती झाली. पुन्हा त्याच अनोळखी व्यक्तीने पंकज यांच्यासोबत संपर्क केला. दुसऱ्यांदा तोतयाने आधीच्या बँकखात्यामधून गेलेले पैसे तुम्हाला परत मिळतील, असे राऊत यांना सांगून दुसरे बँकखाते उघडण्यास सांगितले. दुसरे खाते उघडून अनोळखी व्यक्तीने पाठविलेला मोबाईल क्रमांक संलग्न करण्यास सांगितले. राऊत यांनी अनोळखी व्यक्तीचा मोबाईल क्रमांक स्वत:च्या बँक खात्याशी संलग्न केला. त्यानंतर काही मिनिटांतच त्यांच्या बँक खात्यात दुसऱ्या मुलीचे 40 हजार युटीआयद्वारे जमा झाले. पैसे जमा होताच काही मिनिटांतच पंकज यांच्यासोबत संपर्क साधणाऱ्याने तत्काळ ही रक्कमही काढून घेत फसवणूक केली.

सलग तीन दिवसांत तिसरा गुन्हा -

ग्रामीण भागात सलग तीन दिवसांमध्ये कॅशबॅक व बक्षीस लागल्याचे सांगून खातेदारांची फसवणूक केल्याची ही तिसरी घटना आहे. पहिल्या दोन घटनेमध्ये महिला, तर तिसऱ्या घटनेत युवक तोतयांच्या जाळ्यात अडकला.

अनोळखी व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करू नये. कॅशबॅक किंवा बक्षीस लागल्याचे आमिष दाखविणाऱ्या तोतयांपासून सावध राहावे. अनोळखी व्यक्तीने पाठविलेल्या लिंकवर क्लिक करणे टाळावे.
-तपन कोल्हे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()