Devendra Fadnavis : अवकाळीचा विदर्भाला मोठा फटका!, पावसामुळे ७४०० हेक्टरवरील पिकांच नुकसान

Devendra Fadanvis
Devendra Fadanvis
Updated on

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रात अनेक भागात गारपीट आणि वादळी वारा आला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यातील पारस येथील मंदिरावर झाड कोसळल्यामुळे ७ भाविकांचा मृत्यू झाला आहे. 

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीची घोषणा केली आहे. अमरावती, अकोला बुलढाणा आणि वाशिमध्ये २४२ गावे अवकाळी पावसाने बाधित आहेत. एकूण ७४०० हेक्टर नुकसान झालं आहे. ७५९६ एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे. याचे पंचनामे सुरू झाले आहेत. बाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने तात्काळ मदत दिली जाईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

हेही वाचा- सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करणार. तीन वेळा अमरावती विभागात अशी आपत्ती आली आहे. यापूर्वी आलेल्या आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. त्याची मदत लवकर देण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadanvis
Adani Group बाबत अजितदादांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'कोणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य नाही'

अकोला जिल्ह्यात देखील वेगळी घटना घडली. पारस येथे सात लोकांचा मृत्यू झाला तर ३५ लोक जखमी झाले आहेत. जखमींचा सर्व खर्च सरकार करणार आहेत. कृषीमंत्र्यांदी देखील त्या भागात भेट दिली आहे, असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadanvis
महापालिका निवडणुका कधी होणार? भाजप नेत्याने दिली मोठी अपडेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.