आईच्या चितेला मुलींनी दिला भडाग्नी; रुढी परंपरेला फाटा देत पार पाडले अंत्यसंस्कार

daughters completed whole funeral of their mother in chandrapur
daughters completed whole funeral of their mother in chandrapur
Updated on

राजुरा (जि. चंद्रपूर) : तालुक्यातील विहिरगाव येथील सुमित्राबाई शामराव साळवे (८०) यांचा 3 ऑक्टोबरला वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यांच्या मागे त्यांची दोन मुले व एक मुलगी, नातवंड, आप्तस्वकीय असा मोठा परिवार आहे. सुमित्राबाई यांचा मोठा मुलगा संभाजी उर्फ वामन साळवे हे मराठा सेवा संघ या सामाजिक चळवळीत मागील अनेक वर्षापासून सक्रिय कार्य करीत आहे. 

अनेक पदाची जबाबदारी सुद्धा त्यांनी पार पाडली आहे.  सुमित्राबाई यांचा मुलगा  संभाजी साळवे हे पुरोगामी विचारांचे वाहक असल्यामुळे त्यांनी आपल्या आईच्या तिरडीला मुलगी मिना कातकडे व कवडुबाई धानोरकर तसेच सुनबाई विना साळवे व सविता साळवे यांना खांदा देण्यास सहमती दर्शवून महिलांनाही अंत्यसंस्कार स्थान दिले.

महिलांना अंत्यसंस्कार प्रसंगी अंतिम विधी करण्याची संधी दिली.यावेळी संभाजी साळवे व मारोती साळवे या दोन मुलासह,मुलगी व सुनेने सुद्धा सुमित्रा बाईच्या प्रेताला खांदा देऊन चितेला भडाग्नी दिला. त्यामुळे महिलांनाही अंत्यसंस्कार करतेवेळी अंत्यविधी पार पाडण्याची संधी मिळाल्याने समाजात एक नवीन आदर्श निर्माण केला. 

जेवढा हक्क आईच्या, वडिलाच्या तिरडीला खांदा देण्याचा मुलाचा आहे तेवढाच मुलीचा सुद्धा आहे हे आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले. साळवे परिवाराने 2019 मध्ये आपल्या वडिलांचा अंतिम संस्कार सुद्धा याच पद्धतीने केला होता. 

समाजाने सुद्धा याच पद्धतीने अंतिम संस्कार करून मनात असलेली भीती घालवावी. तसेच मुलगा आणि मुलगी यात भेद न पाळता समाजात आदर्श निर्माण करावा. आणि मुलगा व मुलगी समान हक्काचे वाटेकरी असल्याचे पुन्हा एकदा सिध्द करून दिल्यामुळे साळवे परिवाराने समाजासमोर आदर्श निर्माण करीत रुढी परंपरेला फाटा दिला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.