मौत-हयात अल्लाह के हाथ में है... ये कोरोना क्या चीज है!

akola gmc.jpg
akola gmc.jpg
Updated on

अकोला : मौत-हयात अल्लाह के हाथ में है और हम सबका ये भरोसा है कि मौत बरहक है. जिस दिन मौत लिखी होगी, आयेगी. हमारी और सबकी आएगी. किसी को नहीं पता की कौन कब तक जिंदा है, लेकिन जब तक भी हम जिंदा है दूसरों की जान बचाने तथा उन्हें हौसला देणे का काम करते रहेंगे. ये कोरोना क्या चीज है. उससे हम नहीं डरते. हे शब्द आहेत सर्वोपचार रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह, संशयीत व क्वारंटाईन रुग्णांना रोज जेवण, नाश्‍ता, चहा पाणी देणाऱ्या रुग्णसेवक शेख अफसर अली असगर अली यांचे. कोरोना संकटाच्या या काळात ते कोरोना विषाणूशी टक्कर देत जीवावर उदार होऊन रुग्णसेवा करत आहेत. 

कोरोना संकटाच्या या काळात प्रत्येक व्यक्ती स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी आपण आणि आपले कुटुंब व आपले नातेवाईक कसे या संकटातून बाहेर पडू हाच विचार प्रत्येक नागरिक करत आहे. परंतु शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांव्यतिरीक्त इतरही काही नागरिक आहेत जे या संकटाच्या काळात कोरोनाला हरवण्यासाठी काम करत आहे. जुने शहरातील काळा मारोती हनुमान मंदिराजवळ राहणारे शेख अफसर अली असगर अली हे सुद्धा आयुष्याच्या उतार वयात ५९ व्या वर्षी कोरोना संशयीत व पॉझिटिव्ह रुग्णांना सेवा देत आहेत.

या रुग्णांना भेटण्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्य घाबरत असतानाच शेख अफसर या रुग्‍णांना त्यांच्या बेडपर्यंत प्रत्येक दिवशी रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात येणारा सकाळचा चहा, नाश्‍ता, बिस्कीट, दुपार व रात्रीचे जेवण, दुपारचा चहा, फळ पोहचवण्याचे काम करत आहेत. त्यासोबत रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांना पिण्याचे पाणी सुद्धा पोहचवत आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही सरकारी सेवेत कार्यरत नसताना केवळ अन् केवळ रुग्णसेवेसाठी ते हे काम करत आहेत. त्यासाठी त्यांना रुग्णालय प्रशासनाने परवानगी सुद्धा दिली आहे. 

दिवस उजाडण्याआधीच सुरु होते काम
५९ वर्षांचे रुग्णसेवक शेख अफसर यांचे काम दिवस उजाडण्याआधीच सुरु होतो. लवकर उठल्यानंतर ते सकाळी ६.३० वाजताच सर्वोपचार रुग्णालयात पोहचतात. त्यानंतर रुग्‍णांना चहा पोहचवतात. या कामात त्यांना इतरांचे सुद्धा सहकार्य लाभते. दिवसभर रुग्णांची सेवा केल्यानंतर ते रात्री त्यांना जेवण पोहचवूणच घरी परततात.  

सुरक्षेसाठी प्रशासनाने दिली पीपीई किट
कोरोना रुग्णांची सेवा करत असताना अफसर यांना रुग्णांच्या रोज जवळ जावे लागते. त्यामुळे रुग्णालय प्रशासन त्यांना सुरक्षेसाठी पीपीई किट सुद्धा देते. परंतु सॅनिटायझर व हॅंड ग्लोज स्वखर्च करुन ते वापरत आहेत. 

स्वखर्चातून जेवण व फळांची व्यवस्था
कोरोना रुग्णांना सेवा देण्यापर्यंतच मर्यादीत न राहता शेख अफसर रुग्णांना स्वखर्चातून जेवण व फळ सुद्धा खाण्यासाठी देत आहेत. त्यासाठी त्यांना काही इतर समाजसेवक सुद्धा सहकार्य करत असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.