वेकोलि खाणीतील पाण्यात बुडून मजुराचा मृत्यू; आर्थिक मदतीची नातेवाईकांची मागणी

Death of a laborer by drowning in Vekoli mine Chandrapur crime news
Death of a laborer by drowning in Vekoli mine Chandrapur crime news
Updated on

राजुरा (जि. चंद्रपूर) : पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या मजुराचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना पोवनी-३ कोळसा खाणीत घडली. वेकोलिअंतर्गत खासगी कंपनीच्या मुन्ना कंत्राटदाराकडे तो कार्यरत होता. विशाल गणपत हंसकर (वय १९, रा. वरोडा) असे मृत कामगाराचे नाव आहे. वेकोलिकडून आर्थिक मदतीची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

बल्लारपूर वेकोलि क्षेत्रांतर्गत येत असलेल्या पोवनी-३ या कोळसा खाणीत खासगी कंपन्या काम करीत आहेत. मुन्ना नामक कंत्राटदाराकडे वरोडा येथील विशाल हंसकर हा काम करीत होता. शनिवारी दिवस पाळीत काम करीत असताना पाण्यातील मोटारपंपचा पाइप जोडण्यासाठी तो गेला होता. पंप जोडताना खोल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा समोर आला आहे.

पोवनी-३ या कोळसा खाणीकरिता साखरी, पोवनी, वरोडा, चिंचोली परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. परंतु, येथील प्रकल्पग्रस्तांना अजूनही नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. यानंतरही खासगी कंपन्यांकडून कोळसा काढण्याचे काम सुरू आहे. वेकोलिच्या मनमानी कारभाराला अनेक प्रकल्पग्रस्त बळी पडत आहेत. चार दिवसांपूर्वी वेकोलिच्या नियोजन अधिकाऱ्यांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे २० वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

नेर येथे शेतकऱ्याची आत्महत्या

यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील स्थानिक चिरडे ले-आऊट येथील एका ५० वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. निरंजन नामदेव राऊत असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. चिरडे ले-आऊटच्या बाजूला एका झाडाला गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. घटनेची माहिती नेर पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

मृत शेतकऱ्याकडे तीन एकर शेती आहे. नापिकीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, दोन मुले आहेत. नेर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक इंगळे यांच्या मार्गदर्शनात जमादार राजेश चौधरी करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()