अमरावतीच्या काठीला ४५ राज्यांत मागणी; राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काठी तयार करणे एक उत्कृष्ट कलाकौशल्य

Demand for Amravati stick in 45 states
Demand for Amravati stick in 45 states
Updated on

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पूर्ण गणवेशात दंडाला (काठी) अनन्य महत्त्व आहे. भरीव आणि उत्कृष्ट प्रतीची काठी धामणगावनगरीत तयार होते. नागपूर येथे दरवर्षी होत असलेल्या रेशीम बागेच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिक्षा वर्गात ४५ प्रांतातील ११ क्षेत्रांमधून स्वयंसेवक येतात. या स्वयंसेवकांकडे दरवर्षी धामणगावची काठी पोहोचते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात काळी टोपी, पांढरा शर्ट, खाकी फुलपॅंट, पट्टा, मोजे, जोडे आणि काठीचा प्रामुख्याने समावेश आहे. काठी तयार करणे एक उत्कृष्ट कला व कौशल्य आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये असो की अन्य ठिकाणी काठी ही भरीव व भाजलेली सरळ असणे गरजेचे आहे. काठीविक्रेता शेतकऱ्यांच्या शेतातील धुऱ्यावर असलेले बांबूचे कुंदे खरेदी करतात. त्यानंतर बांबूंना काठीमध्ये रूपांतरित करण्यासाठी विक्रेत्यांना खूप परिश्रम करावे लागतात.

काठीला (दंड) सरळ करण्यासाठी जवस तथा सरकी तेलाचा वापर करावा लागतो. तद्‌नंतर विस्तवावरून या काठ्यांना भाजले जाते. या प्रक्रियेनंतर उन्हात गठ्ठे करून काही दिवस ऊन दिल्यानंतर काठ्या सरळ टवटवीत भरीव आणि वापरण्यायोग्य होतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्र असलेले नागपूर येथील रेशीमबाग याठिकाणी दरवर्षी संघाचा वर्ग होत असतो.

या वर्गात देश-विदेशातील ४५ प्रांतांतील ११ क्षेत्रांमधून संघ स्वयंसेवक उपस्थित राहतात. अनेक स्वयंसेवक धामणगावची काठी वापरतात. आपल्यासोबत घेऊनसुद्धा जातात. प्रत्येक प्रांतात धामणगावची काठी पोहोचते. तसेच ज्याठिकाणी शंकरपट भरविला जात होता, त्या ठिकाणी धामणगावच्या प्रसिद्ध काठीची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते.

गौरवास्पद कलाकौशल्य

उत्कृष्ट काठी तयार करण्याच्या कलेत धामणगावनगरीचे नाव पूर्वीपासूनच अग्रेसर आहे. येथील नंदेश्‍वर, भैसारे व अन्य काही कुटुंब प्रामुख्याने काठी तयार करतात. त्यांनी तयार केलेली काठी आम्ही संघांच्या शाखांमध्ये लहानपणापासूनच वापरतो आहे. धामणगावनगरीत काठी तयार करण्याबाबत उत्कृष्ट कलेचे दर्शन घडते. ही बाब गौरवास्पद असल्याचे प्रांत सहसंघचालक चंद्रशेखर राठी यांनी सांगितले.

विदर्भात काठ्या वापरल्या जातात
अनेक वर्षांपासून काठ्या पुरवीत आहो. माझे आजोबा पांडुरंग, वडील शंकरराव, मी आणि आता माझा मुलगा नीलेश अनेक वर्षांपासून या व्यवसायात आहे. आम्ही तयार केलेल्या काठ्या (दंड) नागपूर येथील संघ कार्यालयात जात आहेत. याव्यतिरिक्त विदर्भातील अमरावती, वर्धा, हिंगणघाट, बुलडाणासह पूर्ण विदर्भात आम्ही तयार केलेल्या काठ्या वापरल्या जातात. 
- शेषराव नंदेश्‍वर,
कारागीर, धामणगावरेल्वे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()