प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे स्वतःला मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्याचे वारंवार सुचविणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पोस्टल मतांनी अक्षरशः तारले. त्यांना साकोली (जि. भंडारा) मतदारसंघातून केवळ २१४ मतांनी निसटता विजय मिळवता आला. भाजपच्या अविनाश ब्राह्मणकर यांनी त्यांना अतिशय निकराची लढत दिली.