Dhananjay Munde : गुजरातला मुजरा केल्याशिवाय ‘ईडी’सरकारचा दिवस निघत नाही; धनंजय मुंडे

माजी मंत्री धनंजय मुंडे : यवतमाळात विराट मोर्चा; नियोजनाची बैठक
Dhananjay Munde statement on ED government Gujarat politics yavatmal
Dhananjay Munde statement on ED government Gujarat politics yavatmalesakal
Updated on

यवतमाळ : ‘ईडी’सरकार आल्यानंतर दहाव्या दिवसानंतर राज्यातील दीड लाख युवकांना रोजगार देणारा प्रकल्प गुजरात गेला. त्यानंतर दुसरा प्रकल्पही त्याच राज्यात गेला. राज्यातील युवक बेरोजगार आहे, असे असतानाही राज्य सरकारचे याकडे दुर्लक्ष होत आहे. गुजरातला मुजरा केल्याशिवाय या राज्य सरकारचा दिवस निघत नसल्याचा आरोप माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी केला. ते सोमवारी (ता.पाच) स्थानिक रॉयल पॅलेस येथे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर अडकणाऱ्या विराट मोर्चा नियोजनाच्या बैठकीत बोलत होते. यावेळी आमदार इंद्रनील नाईक, बाबासाहेब गाडे पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, नाना गाडबैले, माजी आमदार राजू तोडसाम, तारिक लोखंडवाला आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना मुंडे म्हणाले, राज्यातील शेतकरी, बेरोजगार युवक त्रस्त आहेत. महागाईमुळे नागरिक, महिला त्रस्त आहे. मात्र, राज्य सरकारचे याकडे लक्ष नाही. गेल्या काही दिवसांत तर राज्याचे मान, अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरच आक्षेपार्ह विधान केली जात आहेत. हा राज्याच्या अपमान आहे. राज्याची अस्मिता टिकविण्यासाठी तसेच महागाई, शेतकरी आत्महत्या अशा विविध विषयांवर राज्य शासनाला जाब विचारण्यासाठी १९ डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनावर विराट मोर्चा धडकणार असल्याचेही मुंडे म्हणाले. कर्नाटक सीमावाद पेटला आहे. मात्र, राज्य सरकारकडून याबाबत गांर्भीयाने याकडे लक्ष दिले जात नसल्याचा आरोपही मुंडे यांनी केला. हे सरकार कसे आले आहे, हे राज्यातील जनतेला माहिती आहे. महाविकास आघाडी सरकारचे राज्यातील जनतेने स्वागत केले असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.

मुंडे यांचे सुरक्षारक्षक रुग्णालयात

विराट मोर्चाच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रॉयल पॅलेस येथे झाली. बैठकीला मार्गदर्शन करून निघताना माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे सुरक्षारक्षक धनंजय पांडे अचानक कोसळले. त्यानंतर धनंजय मुंडे तसेच पदाधिकाऱ्यांनी त्यांना वाहनात बसवून शहरातील खासगी रूग्णालय गाठले. त्यांच्यावर त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.