दिग्रसचे ७७ वर्षीय परशराम मराठे बनवितात तबला, डफडी व हार्मोनियम; वाद्यांना स्वरसाज चढविण्याची किमया

Digrass Parasharam Marathas make Duffy and Harmonium
Digrass Parasharam Marathas make Duffy and Harmonium
Updated on

दिग्रस (जि. यवतमाळ) : जेथे शब्द अबोल होतात तेथून संगीत बोलू लागते, असे म्हणतात. खरंच संगीतात मोठी जादू असते. तबला, चाटी, ढोलकी, पखवाज, नाळ, खंजिरी, नगारा, डफडी व हार्मोनियम ही वाद्य संगीत निर्मितीची साधने आहेत. संगीतात प्रत्येक वाद्याचे स्वतंत्र अस्तित्व आहे. प्रत्येकाचा ठेका व तालही वेगवेगळा असतो. मात्र, त्या निर्जीव साधनांमध्ये स्वरसाज चढविण्याची खरी जादू असते ती निर्मात्याची. देवनगरातील रहिवासी सेवानिवृत्त शिक्षक परशराम मराठे ४२ वर्षांपासून हे कार्य अविरत करीत आहेत. वयाच्या ७७ व्या वर्षीची त्यांच्या हातातील जादू कायम आहे.

परशराम मराठे हे ४२ वर्षांपासून भजन व वारकऱ्यांना लागणाऱ्या वाद्यसाहित्यांची निर्मिती करतात. तसेच त्यांच्या दुकानात वाद्य दुरुस्तीचीही कामे केली जाते. वयाच्या ७७ व्या वर्षीही त्यांच्या हातातील ही जादू कायम आहे. आजही त्यांचे हे काम जोमाने सुरू आहे. नवीन पिढीसाठी ते आदर्शवत आहे. हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. त्यांना बालपणापासूनच या व्यवसायाची आवड आहे. त्यामुळे ते वडील व आजोबांना या कामात हातभार लावायचे.

व्यवसायासोबतच त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. शिक्षक म्हणून नोकरीला लागले. फावल्या वेळात ते व्यवसायाकडेही लक्ष देत होते. मागील ४२ वर्षांपासून ते या व्यवसायात आहेत. वारकरी, भजनी मंडळे, कलापथक व लावणीतील वादकांना तबला, चाटी, ढोलकी, पखवाज, नाळ, खंजिरी, नगारा, डफडी व हार्मोनियम हे वाद्य आवश्‍यक असतात. ही वाद्य संगीतातील जाणकार व्यक्तीच बनवू शकतो. ज्यांना स्वर व सुरांचे ज्ञान आहे तीच व्यक्ती दर्जेदार व टिकावू वाद्यांची निर्मिती करू शकते.

दुकानावर वादकांची कायम गर्दी

परशुराम मराठे हे त्यातील जाणकार आहेत. ते या व्यवसायात आलेले नवीन बदलही पुणे, मुंबईत जाऊन शिकून घेतात. यवतमाळ जिल्ह्यासह मराठवाडा, आंध्र प्रदेश, कर्नाटक यासह इतर राज्यात त्यांची वाद्य विकली जातात. आजही त्यांच्या दुकानावर वादकांची कायम गर्दी पाहायला मिळते.

नवीन पिढीसमोर आदर्शच

आधुनिक युगातही वारकरी, भजनी मंडळे, कलापथक व लावणीतील कलावंतांच्या वाद्यांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. अनेक नवीन वाद्य बाजारात उपलब्ध आहेत. परंतु, या वाद्यांचे स्वर व सूर दुसऱ्या कोणत्याही वाद्यांसोबत जुळत नाहीत. त्यामुळे आजही हे वाद्य बनविणारे हात कारागिराचेच हवे. परशराम मराठे यांनी ही कला जोपासत नवीन पिढीसमोर आदर्शच ठेवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()