हिंगोली : घर सांभाळून छोटामोठा व्वसाय करीत अनेकजणी घरसंसाराला आर्थिक हातभार लावतात. अनेक महिला शिवणकाम करीत घरातील सर्व जबाबदारी सक्षमपणे निभावत अर्थार्जन करीत आहे.
शहरातील दिक्षा कांबळे यांनीही शिवणकाम करीत कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये सर्व बाजारपेठ बंद असताना मास्क विक्रीतून खर्च वगळता पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले होते. शिवाय दहा महिलांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला. आजही त्या शिवणकाम करुन घरसंसारात मदत करतात.
शहरातील अकोला बायपास भागात नामदेव नगरात दिक्षा कांबळे पती प्रकाश कांबळे व दोन मुलींसह वास्तव्यास आहेत. त्यांची एक मुलगी पाचवी, तर लहान मुलगी दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे. दिक्षा यांचे शिक्षण बीएपर्यंत झाले असून, पती प्रकाश कांबळे हे एका इंग्रजी शाळेत शिक्षक आहेत. दिक्षा लग्नापूर्वी ही शिवणकाम करीत आहे. लग्नानंतरही घरसंसारात मदत म्हणून शिलाईकाम सुरू करण्याचे ठरवले.
त्यांना पती प्रकाश कांबळे यांनीही साथ देत हा व्यवसाय सुरू केला. कोरोना काळात मात्र सर्व व्यवहार ठप्प झाले होते. प्रकाश कांबळे यांची शाळा देखील बंद झाली. त्यामुळे त्यांना उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाली. कोरोना काळात मास्क वापरण्याची सक्ती केल्याने दिक्षा यांनी मास्क शिवून त्याची विक्री करता येईल, असे पतीला सांगितले; मात्र मास्क विकणार कसे असा प्रश्न पडला.
प्रकाश कांबळे यांनी त्यांच्या डॉक्टर मित्रांना याची माहिती दिली. त्यांनी सकारात्मकता दर्शविल्याने मेडिकलवर मास्क विक्री सुरू केली. पुढे त्यांना भरपूर आॅर्डर मिळत गेल्याने त्यांनी इतर महिलांना यात सहभागी करीत या कालावधीत खर्च वगळता पाच लाख रुपये निव्वळ नफा मिळविला; तसेच इतर दहा महिलांना देखील कोरोना काळात रोजगार उपलब्ध करून दिला.
सध्या त्या नामदेव नगरातील लेडीज टेलर म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आतापर्यंत पाच मुलींना शिवणकाम शिकविले. महिलांनी घरसंसारासाठी शिवणकाम, पार्लर, मेहंदी काढणे असे शिक्षण घेतल्यास त्याचा घरसंसारात मोठा उपयोग होतो. छोट्या कुटुंबाचा यात उदरनिर्वाह होतो. यामुळे प्रत्येक मुलींना स्वयंरोजगारासाठी असे व्यवसाय केल्यास त्याचा कुटुंबाला आर्थिक आधार मिळतो, असे मत दिक्षा कांबळे यांनी व्यक्त केल्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.