मानोरा : दिवाळी सण तोंडावर आला असताना तालुक्यांत दुधातील भेसळमध्ये प्रमाण सर्वाधिक आहे. तालुक्यात अनेक महिन्यांपासून भेसळ सर्वेक्षण झाले नाही. अन्न व औषधी प्रशासन विभागाने तपासणी व सर्वेक्षण करून भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.