Sitadahi Pujan: खरीप हंगामात लावगड केलेल्या कापसाची सार्वत्रिक वेचणी सुरू झाली आहे. ग्रामीण भागात सीतादही करण्याची लगबग शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. विदर्भात कापसाच्या काढणीला सुरुवात करण्याआधी 'सीतादही' नावाची ही पूजा केली जाते. आपल्याला भरभरून देणाऱ्या जमिनीचे, पृथ्वीचे आभार मानण्यासाठी ही पूजा केली जाते. वृंदा तोतरे, यांचे पती वकील विजयराव तोतरे यांच्या अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात, बाभळी येथील शेतात, धनत्रयोदशीच्या दिवशी ही पूजा करण्यात आली. सीतादही म्हणजे काय हे सविस्तरपणे जाणून घेऊया.