Samruddhi Accident: 'समृद्धी'वरील मृतांचा DNA अहवाल आला समोर; सर्वांची ओळख पटवण्यात यश

तपास अधिकारी प्रदिप पाटील यांची माहीती
DNA report of dead passengers Samridhi accident received police Pradip Patil sindhkhed raja
DNA report of dead passengers Samridhi accident received police Pradip Patil sindhkhed rajasakal
Updated on

सिंदखेड राजा : सिंदखेड राजा तालुक्यातील जाणाऱ्या समृध्दी महामार्गावरील पिंपळगाव खुंटा गांवाजवळ झालेल्या भीषण अपघातात तब्बल २५ प्रवाशांचा होलपळून जळून कोळसा झाल्यांची दुर्दैवी घटना घडली होती, या प्रवाश्यांचा 'डीएनए' अहवाल प्राप्त झाला असून सर्व प्रवाश्यांची ओळख पटली असल्याची माहिती तपास अधिकारी प्रदिप पाटील यांनी दिली आहे.

DNA report of dead passengers Samridhi accident received police Pradip Patil sindhkhed raja
Samruddhi Express Way : समृद्धी महामार्गावर का होत आहेत अपघात?

याशिवाय घटनास्थळी च्या अवशेषांचे फॉरेन्सिक अहवाल देखील प्राप्त झाल्याची पूरक माहितीही त्यांनी दिली आहे,मृतांच्या नातेवाईकांना मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले. 'क्लेम' करणे व अन्य कार्यवाहीसाठी ही प्रमाणपत्रे सहाय्यक ठरणार आहेत.

अपघात स्थळ परिसरातील अवशेष, वस्तू, उपकरणे, सुटे भाग आदींची 'फॉरेन्सिक' चाचणी करण्यासाठी अमरावतीला पाठविण्यात आले होते. त्याचा अहवालही प्राप्त झाल्याचे तपास अधिकारी प्रदीप पाटील यांनी सांगितले आहे.

DNA report of dead passengers Samridhi accident received police Pradip Patil sindhkhed raja
Nashik Accident News : कंटेनरला धडकून दुचाकीस्वार ठार; एक गंभीर

दरम्यान घटनेनंतर दुर्घटनाग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सचे 'फायर ऑडिट' करण्यात आले होते. एका खाजगी संस्थेतर्फे ही कार्यवाही करण्यात आल्यावर त्याचा अहवाल थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आला आहे, मात्र निर्णायक असलेला बुलडाणा उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा मुख्य अहवाल अजून प्राप्त झालेला नाही.

यात परिवहन विभागाच्या पथकाने केलेली तपासणी, वाहनात करण्यात आलेले 'मोडीफिकेशन' नियमानुसार होते का, वाहनाचे आणीबाणीच्या प्रसंगात वापरण्यात येणाऱ्या 'एक्सिट डोअर' ची स्थिती याची कारणमीमांसा अपेक्षित आहे, हा अहवाल खटल्यातही महत्वाचा घटक ठरू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.