Nagpur News: चहा-बिस्किट मिळालं नाही म्हणून शस्त्रक्रिया अर्ध्यात सोडून गेले डॉक्टर; नागपुरातील धक्कादायक प्रकार

चहा-बिस्कीट न मिळाल्यामुळे डॉक्टर शस्त्रक्रिया न करताच गेले निघून
Nagpur News
Nagpur NewsEsakal
Updated on

चहा आणि बिस्कीट न मिळाल्यामुळे डॉक्टर शस्त्रक्रिया न करताच निघून गेल्याची घटना समोर आली आहे. डॉक्टरच्या या वर्तणुकीबाबत संताप व्यक्त केला जात आहे. चहा आणि बिस्कीट न मिळाल्यामुळे कुटुंब नियोजनाच्या नियोजित चार शस्त्रक्रिया सोडून डॉक्टर निघून गेल्याची घटना घडली आहे. (Latest Marathi News)

नागपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील हा धक्कादायक प्रकार आहे. या संबधित डॉक्टरांची तक्रार करण्यात आली आहे. तक्रारीनंतर जिल्हा परिषदेच्या आधिकारी कुंदा राऊत यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी डॉक्टर भलावी यांना शुगरचा त्रास असल्यामुळे त्यांना चहा बिस्कीटांची गरज होती,त्या वेळेत त्यांना चहा बिस्कीट न मिळाल्यामुळे ते निघून गेले होते.

Nagpur News
Eknath Shinde : लोकांच्या समस्या जाणून घेत CM शिंदेंनी दऱ्यातील हळदीच्या शेतात केलं दोन तास काम!

ही संपुर्ण घटना शुक्रवारी घडली आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील ही घटना आहे. या ठिकाणी ८ महिलांची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया नियोजित करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया सुरू देखील झाली. ४ महिलांची शस्त्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर डॉक्टर भलावी यांना चहा आणि बिस्कीट हवं होतं, मात्र उपस्थित कर्मचारी डॉक्टरांना वेळेत चहा बिस्कीट देऊ शकले नाहीत. त्यामुळे डॉक्टर ४ शस्त्रक्रिया न करताच निघून गेले. दरम्यान या ४ महिलांना ऍनेस्थेशिया देऊन त्यांना शस्त्रक्रियेसाठी तयार करण्यात आलं होतं. (Marathi Tajya Batmya)

Nagpur News
Nashik Marathwada News: आंदोलनाचा देखावा करून पाणी सोडण्यासाठी दबाव; मराठवाडा पाणी हक्क परिषदेची नियमनकडे याचिका

डॉक्टर निघून गेल्यानंतर उपस्थित डॉक्टरांनी सार्वजनिक विभागाच्या दुसऱ्या डॉक्टरांच्या मदतीने या शस्त्रक्रियेची व्यवस्था केली. हा संपुर्ण प्रकार अतिशय धक्कादायक आहे. नियोजित शस्त्रक्रिया अशा प्रकारे डॉक्टरांनी मध्येच सोडून गेल्यामुळे या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या आधिकारी कुंदा राऊत यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

तर या डॉक्टरांनी आपलं स्पष्टीकरण देखील दिलं आहे. मला शुगर आहे, मला वेळेत चहा बिस्कीट न मिळाल्यामध्ये अस्वस्थ वाटू लागलं त्यानंतर मी शस्त्रक्रिया करू शकत नव्हतो, त्यामुळे मी निघून गेलो असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

Nagpur News
Sinhgad Crime : गळा चिरलेल्या अवस्थेत आढळलेल्या कंपनी कामगाराचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.