वेदनादायक! डॉक्टरचाच उपचाराविना मृत्यू

mustak
mustak
Updated on

यवतमाळ : शेकडो रुग्णांना दुर्धर आजाराच्या दाढेतून बाहेर काढणाऱ्या डॉक्टरचाच उपचाराअभावी ह्रदयविकाराने मृत्यू झाला. एका रुग्णालयाने त्यांना भरती करण्यास नकार दिला. तर, दुसऱ्या डॉक्टरकडून रिस्पॉन्स मिळाला नाही. ही घटना गुरुवारी (ता. दहा) पहाटे पाचच्या दरम्यान घडली.

डॉ. शेख मुश्ताख शेख खलील (वय ४५, रा. पुष्पुकुंज सोसायटी, आर्णी रोड, यवतमाळ) असे त्यांचे नाव आहे. डॉ. शेख मुश्ताक एमडी गोल्ड मेडालिस्ट आयुर्वेदतज्ज्ञ होते. त्यांचे पुष्पकुंज सोसायटीत हॉस्पिटल आहे.

पहाटेच्या दरम्यान त्यांना अत्यवस्थ वाटत असल्याने मुलगा व मदतनीसाने घराजवळ असलेल्या प्रसिद्घ खासगी रुग्णालयात नेले. गेटवरच त्यांना थांबविण्यात आले. रुग्ण स्वत: डॉक्टर असल्याचे सांगितल्यानंतरही त्यांना भरती करून घेतले नाही म्हणून मित्रच असलेल्या डॉक्टरचे खासगी हॉस्पिटल गाठले. त्या डॉक्टरच्या मोबाईलवर फोन लावला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. प्रकृती अधिकच बिघडत असल्याने अखेर त्यांना वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

कोविडमुळे खासगी रुग्णालयात उपचार करण्यास डॉक्टरांकडून नकार दिला जात असल्याची ओरड ऐकायला मिळते. मात्र, प्रसिद्घ डॉक्टरवरच ही वेळ आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. डॉ. शेख यांचा मृत्यू झाल्यावर त्या डॉक्टरांकडून आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया देण्यात आल्या.

बोलके व्यक्तिमत्व
डॉ. मुश्ताख शेख यांनी अनेकांना ठणठणीत बरे केले. यवतमाळ शहरातील अनेक कुटुंबांचे ते ‘फॅमिली डॉक्टर’ होते. रुग्णांचे सुख-दु:ख वाटून घेणारे बोलके व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाने रुग्णांनाही आपले अश्रू रोखता आले नाही.

सविस्तर वाचा - कुंभ मेळा संपल्यानंतर नागा साधू कोठे जातात?

तपासणी शुल्काचा आग्रह नाहीच
डॉ. शेख यांच्याकडे विविध आजारांचे रुग्ण यायचे. उमरसरा येथील भांडे घासणारी महिला त्यांच्याकडे उपचाराला गेली. डॉक्टरांना उपचार करताना कौटुंबिक माहिती मिळाली. भांडे घासून उदरनिर्वाह करते, असे सांगताच डॉक्टरांनी तपासणी शुल्काचे पैसे घेतलेच नाहीत. आता ती महिला ठणठणीत आहे. डॉक्टर साहेब, आपल्यात नाहीत, यावर विश्‍वास बसत नाही, असे त्या महिलेने सांगितले.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.