डोळ्यांना पट्टी बांधून जाणणार नेत्रहीनांच्या वेदना; करणार नेत्रदानाचा संकल्प

डोळ्यांना पट्टी बांधून जाणणार नेत्रहीनांच्या वेदना; करणार नेत्रदानाचा संकल्प
Updated on

अमरावती : जावे त्याच्या वंश त्याला कळे तेव्हा, अशी एक म्हण आहे. त्यानुसार नेत्रहीन बांधवांच्या वेदना प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी काही मिनिटांपर्यंत डोळ्यांवर काळी पट्टी बांधून त्याची जाणीव आपण स्वतःच करावी, असा एक उपक्रम हरिना फाउंडेशनच्या वतीने जागतिक नेत्रदान दिनी आयोजिण्यात आला आहे. १० जून रोजी अमरावती शहरात हजारो नागरिक काही मिनिटांपर्यंत डोळ्यांवर काळी पट्टी बांधून नेत्रदानाचा संकल्प करणार आहेत. (donate-eye-on-World-Eye-Donation-Day)

१० वर्षांपासून नेत्रदानाच्या क्षेत्रात कार्यरत हरिना नेत्रदान समितीच्या वतीने हा आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, लोकप्रतिनिधी तसेच सेलिब्रिटींनासुद्धा या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी १० जूनला त्यांच्या घरी जाऊन या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. आयोजन समितीचे अध्यक्ष सारंग राऊत, व्यावसायिक चंद्रकांत पोपट, मनोज राठी, प्रा. मोनिका उमप आदींसह अन्य पदाधिकारी या उपक्रमासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.

डोळ्यांना पट्टी बांधून जाणणार नेत्रहीनांच्या वेदना; करणार नेत्रदानाचा संकल्प
प्रियकराच्या भेटीसाठी रचले अपहरण नाट्य; अनैतिक संबंधाचा कळस

या उपक्रमासाठी तब्बल १५ हजार काळ्या फिती तयार करण्यात आल्या असून त्याचे वितरणसुद्धा करण्यात आले आहे. १० जूनला सकाळी १० वाजता हरिनाचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, पालकमंत्र्यांचे निवासस्थान तसेच लोकप्रतिनिधींच्या घरी जाऊन डोळ्यांना काळी पट्टी बांधून या उपक्रमात सर्वसामान्यांना सहभागी करून घेणार आहेत.

सातासमुद्रापार होणार सहभाग

अमरावती जिल्ह्यामध्ये होणाऱ्या या उपक्रमात केवळ स्थानिक नागरिकच नव्हे तर अमेरिका, इंग्लंड, कॅलिफोर्निया येथील भारतीय मूळ वंशाचे असंख्य नागरिकदेखील सहभागी होणार आहेत. त्यामुळे यंदाचा जागतिक नेत्रदान दिवस हा खऱ्या अर्थाने ग्लोबल ठरणार आहे.

डोळ्यांना पट्टी बांधून जाणणार नेत्रहीनांच्या वेदना; करणार नेत्रदानाचा संकल्प
नागपूरकरांनो, संपूर्ण अनलॉक नाहीच! वाचा काय असणार सेवांची नवीन वेळ

नऊला होणार बालकांची नेत्रतपासणी

नऊ जून रोजी खापर्डे बगिचास्थित मंगलजीभाई पोपट नेत्रालय येथे सकाळी १० वाजतापासून बालकांसाठी नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यांच्यावर पुढील उपचारासाठी मार्गदर्शन तसेच मदत करण्यात येईल, असे चंद्रकांत पोपट यांनी सांगितले.

(donate-eye-on-World-Eye-Donation-Day)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.