पांढरकवडा (जि. यवतमाळ) : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे गरीब, कष्टकऱ्यांचे राष्ट्रीय महामार्गावरून आपल्या गावाकडे पायी मार्गक्रमण सुरू आहे. पायी गावाकडे निघालेल्या तब्बल 20 लाख नागरिकांना पोटभर जेवण देण्याची किमया बाबा कर्नलसिंग खेरा या 81 वर्षीय वयोवृद्ध तरुणाने साधली आहे.
बाबा कर्नलसिंग खेरा यांनी यांनी वयाच्या 11 व्या वर्षीपासून घरदार सोडले. गोरगरिबांच्या मदतीसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी खर्ची घातले. राष्ट्रीय महामार्गावरील करंजी गावाजवळ तयार केलेल्या एका छोट्याशा शेडमध्ये लंगर सेवेच्या माध्यमातून मागील 32 वर्षांपासून बाबा खेरा यांच्या वतीने विनामूल्य सेवा देण्यात येत आहे. शिक्षणाची पाटी कोरी असलेल्या या व्यक्तीने जगातील निरनिराळ्या भाषांवर प्रभुत्व मिळविले.
href="https://www.esakal.com/vidarbha/mp-wife-gives-haircut-mla-husband-299636?amp" target="_blank">Video :खासदार पत्नी आमदार पतीचे केस कापतात तेव्हा...
देशात कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे लागू करण्यात आलेली संचारबंदी आता पाचव्या टप्प्यावर आहे. लॉकडाऊनची स्थिती उद्भवल्यामुळे विविध राज्यांमध्ये अडकून पडलेले हजारो, लाखो स्थलांतरित आपल्या गावाकडे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरून पायी मार्गक्रमण करत होते. उपाशीपोटी होत असलेली त्यांची दैना पाहून बाबा कर्नलसिंग यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असणाऱ्या सेवाभावी लंगर सेवेच्या माध्यमातून नागरिकांना पोटभर जेवणाची सोय उपलब्ध करून दिली.
लॉकडाऊनदरम्यान मागील दोन महिन्यांपासून करंजी रोडवरील खैरा बाबा यांनी स्थापन केलेल्या लंगर शेडमध्ये 24 तास जेवणाची व्यवस्था अखंडितपणे सुरू आहे. यासाठी वयोवृद्ध तरुण बाबा खेरा अहोरात्र झटत असून, त्यांच्या सोबतीला 17जणांची टिम लंगर सेवा देण्यासाठी परिश्रम घेतांना दिसत आहे.
एका मोठ्या डोण्यात वरण भात लोणचे तर सोबतीला वेगवेगळ्या प्रकारची भाजी जेवणासाठी मिळत होती. ट्रक, कंटेनर, ट्रॅव्हल इत्यादी विविध वाहनातून तसेच पायदळ चालत जाणा-या जवळपास 20 लाख स्थलांतरित नागरिकांना या लंगर सेवेचा लाभ मिळत आहे. लहान मुले, गरोदर माता, भगिनी यांच्यासाठी चहा, दुध, ब्रेड, बिस्किटे यांची देखील व्यवस्था करण्यात आली.
अनवाणी पायांनी चालत आलेल्यांना चप्पल, जोडे याठिकाणी देण्यात आले. अन्न पाण्याविना भटकंती करत असलेल्या मुक्या जनावरांच्या खाद्यपदार्थ ची सोय लंगर ठिकाणी केली होती. लोकसहभागातून सुरू असलेल्या खेरा बाबांच्या या मदत कार्यात अनेक दानशूर व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.