Bor Dam
Bor Dam

काय सांगता, तब्बल दहा वर्षांनंतर उघडणार त्या धरणाची दारे! 

Published on

हिंगणी (जि. वर्धा) : यावर्षी आतापर्यंतच्या पावसामुळे राज्यातील सर्वच धरणे, जलाशय शंभर टक्‍के भरले आहेत. अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्गही सुरू आहे. जिल्ह्यातील मोठे धरण म्हणून ओळख असलेले बोरधरण सुद्धा शंभर टक्‍के भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे यातून पाण्याचा विसर्ग होणार असून रविवारी, २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता तीन गेटमधून दहा सेंटीमीटरने पाणी सोडण्यात येणार आहे.

गत दहा वर्षानंतर बोरधरण जलाशय 85 टक्‍के भरले आहे. सध्या बोरधरणची क्षमता 330.40 मीटर एवढी आहे. त्यापैकी पाण्याने 328.90 मीटर एवढी क्षमता गाठली आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

रविवारी सकाळी ११ वाजता बोर धरणाच्या तीन गेटमधून जवळपास दहा सेंटीमीटर पाणी सोडण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. सी. राहणे, तसेच उपअभियंता यू. बी. भालेराव यांच्या उपस्थितीत पाणी सोडले जाणार असून पोलिस, महसूल, तसेच नदी काठील २० गावांना आजच सूचना देण्यात आल्या आहे. 


स्थानिक प्रशासनाकडून नदी काठील बोरी, हिंगणी, मोही, ब्राह्मणी, घोराड, सेलू, धानोली, बेलगाव, कोटंबा, जयपूर, मटका चानकी, कोपरा, देऊळगाव, गोहदा, लहान आर्वी, पिंपळगाव, सुकळी आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आता पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नागरिकांनीसुद्धा सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन समिती पूर परिस्थिती निर्माण झाल्यास युद्ध पातळीवर काम करेल. 
- महेंद्र सोनवणे, 
तहसीलदार, सेलू.
 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()